Dhule - संचेती ॲडव्हान्स ऑर्थोकेअर हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने धुळे शहरात दिनांक २९ सप्टेबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडांवरील तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली. याप्रसंगी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. कृष्णमोहन सैंदाणे, डॉ. संदीप पटवर्धन, डॉ. विवेक सोढाई, डॉ. ईशांत शेवते, पाटील एक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ. दीपक दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटनानंतर डॉ. संदीप पटवर्धन आणि डॉ. दीपक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत शिबिरासंदर्भात सविस्तर माहिती देवून शिबिराशी संबंधित विविध प्रश्नांवर पत्रकार बांधवांना समाधानकारक उत्तरे देत शंकांचं निरसन केलं. संचेती हॉस्पिटल तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय सेवा सुविधा, आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम, रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांच्या पद्धती याविषयी डॉ. संदीप पटवर्धन यांनी विस्तृत माहिती दिली. शिबिरात खांद्यांच्या दुखापतीवरील तज्ञ डॉक्टर्स आणि लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतींवरील तज्ञ डॉक्टर्सनी शिबिरात सहभागी झालेल्या बाल रुग्णांची तपासणी करून उपचार करतात. रुग्णांच्या सुविधेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संचेती हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर धुळे येथे डॉ. दीपक पाटील यांच्या एक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील अशी माहिती डॉ. संदीप पटवर्धन यांनी दिली. लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतींवरील उपचार पद्धतींची माहिती देऊन आवश्यक उपचारांसाठी पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचार घेण्याचा सल्ला दिला. शिबिरात खांद्याच्या दुखापतींवरील फ्रोजन शोल्डर, खांदा दुखी, खांद्याचा संधिवात, शोल्डर फ्रॅक्चर, मसल टेलर, रोटेटर कप, खांदा लिगामेंट, दुखापत इंजुरी तसेच लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतींवरील सेरेब्रल पाल्सी, पोलिओ, पाय सपाट असणे, जन्मतः वाकडे पाय, जन्मतः असलेली हाता पायांची अपंगत्वे, तिरकी मान, चालण्यातील दोष, लहान मुलांचे फ्रॅक्चर, चिटकलेले गुडघे, बेंड असलेले पाय इत्यादी प्रकारांची तपासणी करण्यात आली. ही संकल्पना महाराष्ट्रातील संचेती रुग्णालयात पुणे येथे मागील 20 वर्षांपासूनसुरू करण्यात आली असून ती अनोखी आहे. याचा फायदा रुग्णांनी करून घ्यावा असे आवाहन पत्रपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याचबरोबर संचेती हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आणि सुविधा यांच्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक सोई हे संचेती हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे. हाडांच्या दुखापतींनी त्रस्त असणाऱ्या बालकांना घेऊन मोठ्या संख्येने पालक या शिबिरात आले होते. या शिबिरामुळे अनेक बाल रुग्णांना योग्य उपचार मिळून त्यांच्या व्याधी दूर होतील असा विश्वास डॉक्टर संदीप पटवर्धन आणि डॉक्टर दीपक दिनकर पाटील यांनी व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments