धुळे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेॅ पक्षाच्या वतीने दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या भगवा सप्ताहात धुळे शहराच्या विविध प्रभागात तसेच विभागात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे .आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान जुने धुळे विभाग शिवसेनेच्या वतीने सुभाष चौक येथे शिवसेना जुने धुळे विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.
सदर अभियानाचे उद्घाटन शिवसेना संपर्कप्रमुख माजी आ. अशोक धात्रक , शिवसेना उपनेते शुभांगी पाटील,शिवसेना धुळे शहर विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील , सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री ,सहसंपर्कप्रमुख हिलाल आण्णा माळी ,जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी आ. प्रा. शरद पाटील उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे माजी महापौर भगवान करणकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील महानगर प्रमुख, डॉं सुशील महाजन, , भरत मोरे ललित माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जूने धुळे भागातील पदाधिकारी माजी नगरसेवक गुलाब माळी माजी नगरसेवक नंदलाल फूलपगारे उप महानगर प्रमुख शिवाजी शिरसाळे, नैनेश्वर फुलपगरे कैलाश मराठे रविंद्र माळी विष्णु जावडेकर शत्रुघ्न तावड़े सचिन बडगूजर गोकुल बडगूजर वाल्मिक सोनार विजू फूलपगार महेंद्र फुलपगार किरण फुलपगरे मनोज शिंदे नंदू सरदार अमर सोनवणे नागरिकांनी आपला उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला याप्रसंगी शिवसेना धुळे विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील यांनी भगवा सप्ताह बद्दल नागरिकांना माहिती दिली तसेच या भागातील शिवसैनिकांनी नागरिकांच्या प्राथमिक समस्या सोडविण्यावर भर देऊन ज्या नागरिकांचे नव मतदारांचे मतदार यादीत नाव आले नसेल त्यांचे नाव नोंदवून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम आयोजन शिवसेना जूने धुळे विभागा वतीने उपमहानगर प्रमुख प्रमुख शिवाजी शिरसाळे विभाग प्रमुख विष्णू जावडेकर यांनी केले.
Post a Comment
0 Comments