धुळे ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागातील शिरपूर आगाराची एसटी बस क्रमांक MH-20,BL-4090 प्रचंड भयानक दुरवस्था झाली आहे.
ही बस शिरपूर नाशिक शिरपूर या मार्गावर चालत आहे शिरपूर नासिक हे मुंबई आग्रा महामार्गावर दोन्ही गाव येत असतात एवढा मोठ्या लांब पल्ल्याच्या मार्गावर अशी भयानक दुरुस्त असे नादुरुस्त बस का पाठवतात या संदर्भात धुळे विभाग नियंत्रक शिरपूर आगारप्रमुख यांनी प्रवाशांना या संदर्भात माहिती द्यावी किंवा प्रसार माध्यमांना माहिती द्यावी शिरपूर नाशिक शिरपूर शिरपूर धुळे शिरपूर या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक पालक सरकारी कर्मचारी आरोग्य कर्मचारी महसूल कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी मुंबई नाशिक येथे जाणारे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण बंधू भगिनी हे रोज हजारोंच्या संख्येने प्रवास करत असतात पण धुळे विभाग या प्रवाशांच्या सेवे देण्यासाठी सगळ्या नादुरुस्त एसटी बसेस या मार्गावर लांब पल्याच्या मार्गावर पाठवत असतात त्यामध्येच एसटी बसेस रस्त्यावर ब्रेकडाऊन बंद होत असतात त्यामुळे प्रवासांचे प्रचंड हाल होत आहे या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे परिवहन खाते असल्यामुळे त्यांनी तरी लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांची होत आहे एसटी महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व व्यावस्थापकीय संचालक साहेब यांनी तरी या गंभीर समस्या कडे लक्ष द्यावे व धुळे विभागातील शिरपूर आगाराला नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून प्रवाशांची हाल होणार नाही याची काळजी तरी महाराष्ट्र सरकारने घ्यावी अशी मागणी शिरपूरकर धुळेकर प्रवाशांची होत आहे.
जाहिरात -
Post a Comment
0 Comments