शिंदखेडा ( प्रतिनिधी ) - तालुक्यातील सध्या पावसाचे आगमन जोरदार झाले आहे तालुक्यासाठी ही आनंदाची गोष्ट तेवढीच आहे परंतु त्यासोबत शेतकऱ्यांचं दुःखही या पावसामुळे मोठे आहे वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी लाखो रुपये भांडवल उभा करून आपली शेती पेरली परंतु सध्या पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण तालुक्यात जलमय केलेले आहे त्यात प्रामुख्याने माळ माथा परिसरात तसेच तापी काठावरील सर्वच पट्ट्यातील गावांमध्ये पुराने थैमान गाठले आहे.
माळ माथा उगम स्थळी जोरदार पाऊस झाल्याने देगाव, वरझडी, मेथी, सोनशेलु, अंजनविहरे, खर्दे, मांडळ, विखरण, जोगशेलू, कुरकवाडे कामपुर सह अन्य गावांमध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे.
मेथी वरून जाणारी मदारी नदी तसेच भोगावती नदी गेली पाच वर्षांत पहिल्यांदाच दुधडी भरून वाहू लागली या नदीवरती अनेक बंधारे मागील काळात बांधण्यात आले होते परंतु त्यातील काही बंधार्यांच्या बाजूने सर्व पाणी निघून नदीच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्याने चौगाव, दलवाडे प्र.न., चिलाने, विरदेल, रंजाने, जेसाणे लोहगाव, वसमाने पूर्ण तापी काठापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे याचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसलेला दिसून येत आहे तसेच खर्दे मांडळ दोंडाईचा या गावांवरून येणारे भोगावती व लेंडूर नाला याच्यावर अनेक बंधारे वाहून गेलीत त्यामुळे त्या परिसरातील सुद्धा मोठे नुकसान शेतीचे झालेले आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री अनिल पाटील साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे दीपक गिरासे यांनी सर्व परिस्थिती मांडली तसेच प्रत्यक्ष भेटीतून मदतीचा विनंती त्यांना करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली तसेच प्रशासनाने या गावातील पंचनामे करून सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा नुकसानाचे भरीव मोठी रक्कम तात्काळ देऊन त्यांच सांत्वन करणे गरजेचे आहे व नुकसान भरपाई चा मोबदला वेळेवर देऊन त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. जरी सरकारने यावर वेळेत दखल घेतली नाही तर त्याचा फटका येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांकडून दिला जाईल आधी शेतकरी मग पक्ष असे प्रखडपणे मत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
Post a Comment
0 Comments