धुळे - महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक लोकनेते देवेंद्र जी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने महा एनजीओ फेडरेशन व राज्यभरातील संलग्न असलेल्या 65 एनजी ओच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प करण्यात आला होता.
महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शन व सहयोग या उपक्रमास लाभले. मानव आणि निसर्ग यांच्यात दृढ संबंध आहेत. या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला आहे. मानव या निसर्गातूनच जन्माला आला, वाढला आणि इथेच विलीन सुद्धा झाला. या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी या मिळू लागल्या. म्हणून त्याचे जीवन जगणे अत्यंत सोपे झाले. तसेच झाडे ही पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत. झाडांचे ङ्गमानवाच्या जीवनात खूप महत्त्व आहे. जंगले आणि वने ही निसर्गाच्या उत्तम सौदर्याचा साठा आहेत. याजंगलां मधून पोसणारे निसर्गाचे स्वरूप हे मानवाला प्रेरित करते. जर या धरतीवर वन किंवा जंगल नसतील तर मानवाला आपले जीवन जगणे कठीण झाले असते. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' अशा ओळींच्या माध्यमातुन संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व समाजाला समजाऊन सांगितले आहे. महा एनजीओ फेडरेशन संतांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सतत समाजाच्या सेवेत कार्य करीत असते.
लोकनेते देवेंद्र जी फडणवीस यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा निर्धार महा एनजीओ फेडरेशन व मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. डी.एम. आखाडे, अध्यक्ष सौ. आशा आखाडे, सचिव मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे, अक्षय गंगाराम निकम, केतन आनंदा निकम संत श्री आशाराम गुरुकुल चे संचालक श्री. रामभाईजी, सहसंचालीका दर्शना दिदि, आशा रामजी आश्रमाचे कमलेश भाई, प्राचार्य किशोर अहिरे, बाविस्कर सर मराठी माध्यम, सहकारी शिक्षक, शारदा पवार, निता पाटील, रिना चव्हाण यांचे बहुमोल सहयोग लाभला.
Post a Comment
0 Comments