दोंडाईचा ( प्रतिनिधी ) - शिंदखेडा तालुक्यात दलवाडे प्र.न. येथील मदारी नदी वर असलेला बंधारा स्थानिक जिल्हा परिषद सदस्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे शेकडो शेतकऱ्यांचे पेरलेल्या जमिनीचे व पिकांचे खूप मोठे नुकसान झाले प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य ज्या गटातून निवडून येतो तिथल्या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून त्या परिसरातील जनतेच्या समस्यांची निवारण करणे हे कर्तव्य त्याचे असते परंतु आजची परिस्थिती अशी आहे की काही ठराविक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर खरोखर जनतेच्या समस्या सोडवतात परंतु काही महाशय प्रत्येक पंचवार्षिक ला जातीच्या आरक्षणातील गट बदलून आलेले शुभेच्छुक उमेदवार कष्ट प्रयत्न न करता सहज निवडून निवडून येतात निवडणूक संपली की फक्त स्वतःच्या आर्थिक विकासासाठी धडपडत असतात त्याला त्या सर्वसामान्य मतदार बंधूंशी व त्या परिसराच्या विकासाशी काही घेणे देणे नसते कारण त्यांच्या डोक्यावर ज्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं त्या नेत्याचा आशीर्वाद असतो.
आज वरील तुटलेल्या बंधाऱ्याच्या बाबतीत या आधी दुरुस्तीसाठी गावाचे सरपंच रजेसिंग गिरासे यांनी अर्ज करून पाठपुरावा केले त्यानंतर जिल्हा परिषद संबंधित विभागा कडून या बंधारे दुरुस्तीसाठी किंवा त्याच्या मलमपट्टीसाठी अभियंता हे पाहण्यासाठी आले त्यानंतर त्यांनी या बंधाऱ्याचे मोजमाप करून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी ठेवले त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात दुरुस्तीसाठी सहा लाख रुपये ह्या रकमेला प्रशासकीय मंजुरी मिळाली परंतु खेदाची बाब ही आहे की मिळालेल्या मंजुरीनंतर पावसाळ्याला चार महिने बाकी असताना सदर नादुरुस्त बंधाऱ्याची परिस्थिती संबंधित विभागाचे अभियंता यांना माहिती असताना देखील त्या बंदराची दुरुस्ती का झाली नाही? व संबंधित विभागाचे बेजबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे हा बांध तुटला त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पाच वर्षात वाहून आलेले हक्काचे लाखो लिटर पाणी वाहून तर पुढे गेलेच परंतु त्या अनियंत्रित पाण्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे शेतीचे तसेच नुकतेच पेरलेले पिकांचे खूप मोठे नुकसान झाले व काही मूक प्राण्यांचे जीव यात गेले.
तालुक्यात या पावसाळ्यात पहिला बांध नाही तर मांडळ, खर्दे, विरदेल अशा अनेक ठिकाणी सिंचन बांध तुटले मग याला जबाबदार कोण?. अशा बेजबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण कोणाच आहे किंवा नाही? असा प्रश्न जनतेच्या मनात तयार झालेला आहे निवडून गेलेले जिल्हा परिषद प्रतिनिधी असतील किंवा अन्य कोणी लोकप्रतिनिधी असतील यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने दखल का घेतले जात नाही का आपण त्यांना अशा नुकसान झाल्यामुळे धारेवर धरत नाही याचा अर्थ असा होतो की सर्वसामान्य जनतेचा वाली कोणीच नाही माझा शेतकरी बांधवाला अशा अनेक लोकप्रतिनिधींच्या चुका असतील या प्रशासकीय लोकांच्या चुका असतील शेवटी शेतकऱ्याच्याच गळ्याला फास लागतो म्हणून येत्या विधानसभेमध्ये अनेक छोटे मोठे लोकप्रतिनिधी मत मागण्यासाठी आपल्याकडे जरूर येतील तर या सर्व सत्ताधार्यांना आपल्यावर आलेले संकट व झालेले नुकसान त्यावर त्यांनी केलेले त्यांचे काम याबाबतीत विचारणा जरूर करा उगाच यांच्या मागे फिरू नका तरच या लोकप्रतिनिधींना मतदार बंधूंचा धाक तयार होईल व त्यातून विकासाची या तालुक्यात खरी सुरुवात होईल असे मत शेतकरी पुत्र दीपक गिरासे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून मतदार बंधू भगिनींना विनंती केली.
Post a Comment
0 Comments