Type Here to Get Search Results !

शिंदखेडा परिसरात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या मदतीला खासदार डॉ. शोभा बच्छाव धावल्या.

 


शिंदखेडा ( प्रतिनिधी ) -तालुक्यातील चिलानेसह दोंडाईचा शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टीने स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अन्नधान्य सह संसार उपयोगी साहित्य त्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेल्याने ग्रामस्थ पूर्णपणे कोलमोडून गेले आहेत. नुकसानीची माहिती कळताच धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक परिस्थिती पाहता ग्रामस्थांना धीर दिला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करीत बाधितांना शासनाची मदत मिळवून द्यावी याबाबत सूचना प्रशासनास करण्यात आल्या आहेत. 



धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा परिसर म्हणजे हा सततचा दुष्काळी भाग. नापिकी आणि निसर्गाच्या अवकृपेने ग्रासलेला भाग. यंदा मात्र परिसरात चांगला पाऊस होऊन सुगीचे दिवस येतील ही आशा अनेकांनी बाळगली होती. अशातच दोंडाईचा शहरासह शिंदखेडा तालुक्यातील चिलाने व परिसरात प्रचंड अतिवृष्टी पाऊस झाल्याने त्यात स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रचंड झालेल्या पावसामुळे घरातील अन्नधान्या सह कपडे, व जनावरे आणि संसार उपयोगी साहित्य डोळ्यादेखत वाहून गेल्याने स्थानिक ग्रामस्थ प्रचंड कोलमडले आहेत. ग्रामस्थांच्या नुकसानीची माहिती मिळताच धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार तथा माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या नुकसानीची पाहणी करीत स्थानिकांना धीर दिला आहे. दोंडाईचा शहरातील रहिवास वस्ती असलेल्या चैनी रोड, गोविंद नगर या भागात प्रत्यक्ष फिरून तसेच चिलाने गाव परिसरात फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधित झालेल्या नुकसानीची डॉक्टर बच्छाव यांनी पाहणी केली व स्थानिकांना धीर दिला आहे. नुकसानीचे विदारक चित्र पाहता डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तात्काळ दोंडाईचा येथे तहसीलदार ,कृषी अधिकारी, नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी यांची बैठक घेत नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करीत बाधितांना शासनाची मदत मिळवून द्यावी याबाबत सूचना केल्या आहेत. यावेळी डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या समवेत प्रांत शरद मंडलिक, तहसीलदार संभाजी पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर राहुल माणिक, मोहसीन शेख,  नदीम शेख, प्रकाश पाटील, कुलदीप निकम, मोनु बाबा,सुनील चौधरी, सुरेश देसले,ॲड. मोरे पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments