(धुळे दि. १८-०७-२०२४) - धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी मतदार संघातील तालुक्यांना जावून बैठकांचा धडाकाच सुरु केला आहे. त्यांनी काल शिंदखेडा - दोंडाईचा येथील कार्यालयांना भेटी देत आढावा बैठका घेतल्या. यात प्रामुख्याने शिंदखेडा महसूल विभाग आणि पंचायत समिती येथील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावर अनेक तक्रारी असलेली प्रकरणे जागीच निकाली काढण्यात आली. यावर अनेक नागरिकांनी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांचे कौतुक केले. या बैठकी नंतर अनुक्रमे शिंदखेडा व दोंडाईचा नगरपरिषदेत आढावा बैठक झाली. यात शहरातील विविध विकास कामांची माहिती जाणून घेत पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, पंतप्रधान व शबरी, रमाई आवास योजनेच्या प्रलंबित निधीसाठी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या प्रलंबित निधीसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे खासदार शोभाताई बच्छाव यांनी सांगितले.
शिंदखेडा - दोंडाईचा येथील पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतांना शहरातील वाहतूक, सुरक्षा, CCTV कॅमेरे, प्रस्तावित नवीन पोलीस स्टेशन याबाबत तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखील समस्या जाणून घेतल्या. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या समवेत कॉंग्रेस चे अध्यक्ष शामकांत सनेर, सुनील चौधरी, सुरेश देसले, दिनेश माळी, प्रवीण पाटील, राकेश पवार, तसेच, महसूल, पंचायत समिती, कृषी विभातील आणि नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments