Type Here to Get Search Results !

धुळे शहरातून रणजीत राजे भोसले यांनाच उमेदवारी द्या.


धुळे ( प्रतिनिधी )-  धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जिल्ह्याचे निरीक्षक श्री. उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जेष्ठ नेते एन .सी.आबा पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.



    पक्षाच्या बैठकीमध्ये धुळे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री रणजीत राजे भोसले यांनाच उमेदवारी द्यावी असा ठराव संमत करण्यात आला.पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री.नंदू यलमामे यांनी ठराव मांडला व पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार श्री.जोसेफ मलबारी या ठरावाला यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हात उंचावून ठरावाला पाठिंबा दिला व जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांनी सदर ठरावाला निरीक्षकामार्फत प्रदेश नेत्यांकडे पाठवायचे ठरविले. रणजीत राजे भोसले हे प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.सत्ता नसताना त्यांनी मतदारसंघात पक्ष संघटना वाढवली. आपल्या पक्षसंघटन कौशल्याने त्यांनी धुळे शहरात पक्षाला वाढविले व नेतृत्व सिद्ध केले.धुळे शहर मतदारसंघात त्यांचे चांगले काम आहे.दररोज संपर्क आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हिंदू मुस्लिम दलित-आदिवासी-ओबीसी- मराठा समाजामध्ये त्यांचा संपर्क आहे. पक्षाच्या वतीने विविध आंदोलने, निवेदन याद्वारे जनतेच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.शहरांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा असल्याने त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. असे विविध पदाधिकाऱ्यांनी सांगितले.               

धुळे शहर मतदारसंघ हा पारंपारिक राष्ट्रवादी पक्षाचा आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. शहरात शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जीवाचे रान करतील व पक्षाचे उमेदवार श्री. रणजीत राजे भोसले यांना निवडून आणतील असा प्रण आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी घेतला.

   काही स्वार्थी नेत्यांनी धुळे शहरात पक्षाचे विविध पदे भोगली. पक्षाच्या नावे पद, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती जमा केली. परंतु पडत्या काळात आदरणीय पवार साहेबांना सोडून पळाले. पक्षाशी गद्दारी केली. वेळोवेळी त्यांना बोलावले,विनंती केली पण ते पक्षावर हसत होते. काही पदाधिकारी भाजप नेत्यांच्या केबिनमध्ये बसून पदाचे नियोजन करीत होते. आजही काही लोक दोघं बाजूला हात ठेवून आहेत. रात्री एकीकडे तर दिवसा दुसरीकडे अशी त्यांची परिस्थिती आहे. पक्षाच्या जीवावर नगरसेवक, स्थायी समिती सभापती, उपमहापौर, महापौर, गटनेता, विरोधी पक्षनेता झाले. पण पक्षाच्या बैठकीला, आंदोलनाला सहभागी झाले नाही. त्यांनी पक्षाचा कोणताही कार्यक्रम घेतला नाही. काही तर अजित पवार गटात गेले. परंतु आता शरद पवारांच्या पक्षाला चांगले दिवस येत आहेत म्हणून काही लोक बेडूक उड्या घेण्याच्या प्रयत्नात आहे. अशा संधी-साधू गद्दारांना पक्षात घेऊ नये असे ठरावांमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments