शिंदखेडा (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेसाठी शिंदखेडा मतदार संघातून अनेक मातंबर उमेदवारांची उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे शिंदखेडा विधानसभा मध्ये गेल्या पंधरा वर्षापासून भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार रावल हे सर्वांना परिचित आहेत परंतु गेली पंधरा वर्ष एक हाती सर्व सत्ता देवून देखील शेतकरी वर्गाचा प्रमुख पाण्याचा प्रश्न आज देखील सुटला नाही ही सुद्धा जनतेला खेदाची बाब आहे परंतु अनेक उमेदवार याआधी विधानसभेत आपले भविष्य आजमावून पाहिलेले आहे परंतु त्यांना मोठी निराशाच पत्करावी लागली आहे.
सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत यात उमेदवार म्हणून अनेक मातब्बर नेते पुढे आलेले आहेत परंतु यांच्यात एक तरुण व सर्वसामान्य चेहरा म्हणून शेतकरी पुत्र दीपक गिरासे यांच्या उमेदवारीची चर्चा ग्रामीण भागात सुरू झालेली दिसून येत आहे परंतु अजून त्यांनी कुठल्याही या उमेदवारीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही जरी गिरासेंनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तर अनेक इच्छुक नेत्यांना ते अडचणीचे ठरू शकतील दीपक गिरासे यांचा मागील काळात त्यांनी दोन मेथी गटात निवडणुका लढल्या पंचायत समितीत अवघे दीडशे मतांनी पराभव झाला व नुकत्याच जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी करून भाजपची व काँग्रेसची तिहेरी लढत देऊन चार हजारांच्या जवळपास मत मिळवण्यात त्यांना मोठे यश आले. जरी काँग्रेसचा उमेदवार भाजपने आशीर्वादाने उभा केला नसता तर दीपक गिरासे 2000 मतांनी विजयी झाले असते अशी चर्चा त्यावेळी तालुक्यात झाली होती मेथी गट हा भाजपचा बालेकिल्ला असून सर्व ग्रामपंचायती भाजपच्या असताना देखील अपक्ष दीपक गिरासेना एवढे मत पडणे हे भाजपसाठी धोक्याची घंटी आहे असे राजकीय जाणकार म्हणतात.
तालुक्यातील गेल्या काळात गिरासे यांनी सिंचन विहिरीचा घोटाळा व दाबलेले प्रस्ताव समोर आणून प्रशासनाचे धाबे दणकवत सतत पाठपुरावा करून तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मिळून देण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यासोबत पाण्याविषयी प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील, निधीच्या काही समस्या असतील, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी असतील त्यांनी प्रामाणिकपणे सोडविल्या अनेक तालुक्यातील विकास कामांसाठी दीपक गिरासे यांनी गेल्या दहा वर्षापासून आपले कार्य सुरू ठेवले आहे तसेच तालुक्यात शिक्षणाची ज्ञानगंगा म्हणून त्यांनी देगाव सारख्या ग्रामीण भागात जयदीप नॉलेज कॅम्पस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरू केला त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आज होत आहे.
जरी त्यांना जनतेने ताकद व आशीर्वाद दिले तर तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्याची पात्रता त्यांच्यात आहे हे सर्वांनी पाहिले आहे.
या तालुक्यात फक्त श्रीमंत व मातंबर नेत्यांनीच आमदारकी लढावी का असा प्रश्न जनतेतचां आहे ? दीपक गिरासे सारखा सर्व सामान्य कुुंटुबातील शेतकरी पुत्र यांनी जरी उमेदवारी करून आपले भविष्य अजमविण्यात हरकत नाही त्यांच्यासाठी ही विधानसभा व वेळ योग्य राहील असे राजकीय जाणकार मंडळीने मत व्यक्त केलेले आहे. आता पुढे दीपक गिरासे काय निर्णय घेणार आहेत यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
Post a Comment
0 Comments