भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह पाच जणांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.
Swarajya LakshyaMay 18, 20240
धुळे :हर हर महादेव व्यायाम शाळेच्या पैलवाणाने मुलीची छेड काढल्याने भारतीय जनता पार्टी चे धुळे अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपाळकर, सतीश अंपळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध पोस्को सह 354,324 अंतर्गत कोर्टाने गुन्हे दखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ह्या प्रकरणासंदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री पीडित गुन्हा नोंदवायला गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट कल्याणी अंपळकर यांनी दाखल केलेली तक्रार नोंदवून घेत फिर्यादी, तिची आई व दोन्ही भावांना अटक केली. त्यामुळे त्यांना रिमांड होम मध्ये ठेवण्यात आले होते अशी माहिती पत्रकार परिषद येथे देण्यात आली आहे.
बाहेर आल्यानंतर पुन्हा चाळीसगाव रोड पोलिसांना विनंती करण्यात आली मात्र त्यांनी नकार दिल्याने या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने खातर जमा करून पोक्सो सह भा. दं. वी 354,323,504,506(2),143,147,148,149 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. संशयित आरोपीमध्ये हर हर महादेव व्यायाम शाळेचा कुस्ती प्रशिक्षक दादू राजपूत, गजेंद्र महादेव अंपळकर, कल्याणी सतीश अंपळकर, सुहास सतीश अंपळकर, जतिन उर्फ अजय आव्हाळे यांचा समावेश आहे.
Post a Comment
0 Comments