धुळे ( नागींद मोरे )- एकेकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकत आहे. यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने, पुन्हा एकदा भाजप व काँग्रेसमध्येच खरी लढत रंगणार आहे.
दोन्हीही पक्ष आपापल्या उमेदवाराला पक्ष संघटनेचा पाठिंबा मिळवून घेत आहे. आणि मिळालेल्या या पाठिंबावरच त्यांचं भवितव्य ठरवलं जाणार आहे. त्यातच भारतीय जनता पक्ष यांनी आतापर्यंत बहुतेक पक्ष संघटना आणि समाज यांचा पाठिंबा मिळून आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचा भाग असलेल्या अध्यात्मिक आघाडीचे धुळे जिल्हाध्यक्ष तसेच खानदेश वारकरी सेवा मंडळाचे विश्वस्त अशोक आप्पा गवळी यांनी पुन्हा तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरे यांनी खासदार आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला कमळा समोरील बटन दाबून डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा खासदार करा असे आवाहन धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना तसेच सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार तसेच जिल्ह्यातील सर्व साधू, संत, महंत, सर्व मंदिरातील पुजारी, भक्त यांना त्यांनी आवाहन केले आहे.
पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना दोनही पक्षांनी आपापल्या परीने प्रचार करत आपल्या पारड्यात मतदारसंघातील नागरिकांचे मत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने समविचारी संघटनेचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करीत आहे. आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये धुळे लोकसभा मध्ये टक्कर बघायला मिळत आहे.
अशातच आध्यात्मिक आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष तसेच लोकसभा प्रमुख अशोक गवळी यांनी धुळ्यातील अध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातील वारकरी मंडळींना आवाहन केले आहे की डॉ. सुभाष भामरेंना मत म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीना मत अर्थात विकासालाच मत, देशाची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी आणि पुन्हा भारत विश्वगुरू बनण्यायासाठी, देव, देश आणि धर्म टिकण्यासाठी डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा निवडून लोकसभेमध्ये पाठवावे असे आवाहन यावेळी केले आहे.
यावेळी अशोक गवळी यांनी सांगितले की, धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये जो काही विकास खुंटला होता, तो विकास गेल्या दहा वर्षांमध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न खासदार सुभाष भामरे यांनी केला आहे. खासदार डॉ सुभाष भामरे हे देखील एक अभ्यासू, विचारवंत आणि आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांना यंदाची निवडणूक देखील मोठ्या मताधिक्या देऊन निवडून त्यांना पुन्हा संसदेत पाठवावे असे आवाहन अध्यात्मिक आघाडीचे तसेच खानदेश वारकरी सेवा मंडळाचे विश्वस्त अशोक गवळी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments