धुळे : कावठी गावाच्या मार्गाने नेर जाणाऱ्या गावठी कट्टा व शस्त्र घेऊन फिरणारे प्रशिक वाघ आनंद मालचे तालुका पोलिसांच्या जाळ्यात दोघांची झडती घेत असताना दोघां जवळ कंबरेला एक एक गावठी पिस्टल व एकाच्या कंबरेला तलवारी सारखे धारदार शस्त्र आढळून आले यांना तात्काळ ताब्यात घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, दोन संशयीत इसम कावठी-शिरढाणे रोडने नेर गावाचे गुलाबवाडी चौकात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे उप-विभाग पो.उप.निरी श्री. दिपक धनवटे, अमोल बोरसे, कुणाल पानपाटील,विशाल पाटील, धिरज सांगळे, ज्ञानेश्वर गिरासे अशांना सुचना देवून कारवाईचे आदेश दिले त्याप्रमाणे पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावला असता 09 वाजेच्या सुमारास कावठी गावाच्या दिशेने रस्त्याने मोटारसायकल क्रमांक-MH-18-AS-2870 वर येणाऱ्या संशयीत इसमांना पोलीस पथकाने मोटार सायकल थांबविण्याचा इशारा केला व ते थांबताच त्यांना जागीच पकडुन पकडलेल्या इसमांना पंचांसमक्ष त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1] प्रशिक पिरन वाघ वय-20 वर्ष रा. तिरुपतीनगर वलवाडी शिवार वाडीभोकर धुळे 2] आनंद सतिष मालचे वय-20 वर्ष रा. इंदिरानगर वाडीभोकर धुळे असे कळविले उपस्थित असलेल्या पंचासमक्ष दोघांची अंगझडती घेता प्रत्येकाच्या कंबरेच्या पॅन्टचे आतील बाजुस एक-एक गावठी पिस्तोल मिळुन खोचलेला मिळून आल्याने त्यांना हत्याराच्या परवान्याबाबत विचारपुस करता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देवुन त्यांच्या जवळ परवाना नसल्याचे सांगितले तसेच आनंद सतिष मालचे वय-20 वर्ष रा. इंदिरानगर वाडीभोकर धुळे याच्या कंबरेला पॅन्टचे आतील बाजुस कमरेस एक तलवार सारखी दिसणारी हत्यार खोचलेला मिळुन आली असुनदोघांवर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
Post a Comment
0 Comments