बोरकुंड : येथे पाचशे वर्षाची परंपरा जपत सकल जैन समाज व ग्रामस्थ यांच्याकडून साला-भादाप्रमाणे यावर्षीही श्री भगवान महावीर स्वामीजी जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जैन मंदिराचे विशेष:त सुमारे 500 वर्षाहून अधिक प्राचीन जैन मंदिर बोरकुंड येथे स्थित आहे, ज्यावेळेस खानदेश मध्ये धुळे,मालेगाव,जळगाव येथे जैन मंदिर नव्हते तेव्हापासून बोरकुंड या ऐतिहासिक प्राचीन बोरकुंड गावात जैन मंदिर स्थित आहे.
इतिहासकर असे सांगतात की ५०० वर्षाहून अधिक प्राचीन काळापासून येथे जैन धर्मीय यांचे श्रद्धास्थान जैन मंदिर स्थित आहे, आणि ५०० वर्षाहून अधिक काळापासून महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा करण्यात येतो. सुरुवातीला मंदिर दगड ,मती, लाकडी होते. काळानुसार वेळोवेळी मंदिराचे जिर्णोद्धार करण्यात आलेले आहे. पण गाभाऱ्यातील मूर्ती भगवान हे प्राचीनच आहे. मंदिराचे मूलनायक श्री मुनिस्रुवत स्वामी भगवान जे शनि महाराजाचे स्वरूप आहे . डाव्या बाजूला आदिनाथ भगवान,व उजव्या बाजूला विश्ववंदनीय श्रमण भगवान, शासनपती,अहिंसा प्रेरक, 24 वे तीर्थंकर अहिंसाचे प्रचारक श्री महावीर स्वामीजी यांची प्रतिमा स्थित आहे.
याप्रमाणे यावर्षीही सकल जैन समाज व ग्रामस्थ यांच्या वतीने गावातून श्री महावीर स्वामीजी भगवान यांची मिरवणूक म्हणजेच वरघोडा नाचत गाजत घोषणा देत मिरविण्यात आला.
मंदिरात बारा महिन्याची बोली पद्धतीने चढावा बोलण्यात आला तसेच आजच्या आरतीचे मानकरी यांच्या हातून महाआरती व ध्वजारोहण करण्यात आले. महाआरती,ध्वजारोहण करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
अशी माहिती बोरकुंडचे जितेंद्र जैन बंब यांनी दिली.
Post a Comment
0 Comments