Type Here to Get Search Results !

भाजपा व काँग्रेस पक्षावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रेहेमान यांनी पत्रकार परिषदेत साधला निशाणा

 


धुळे : धुळे मालेगाव लोकसभा मतदार संघांचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रेहेमान यांनी काल रोजी पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.

     भाजपा व काँग्रेस वंचित बहुजन आघाडी विरुद्ध जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप करत लोकांनी त्यास बळी पडू नये असे पत्रकारांशी बोलतांना अब्दुल रेहेमान म्हणाले. मी गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असून मला गरिबीची जाण आहे.गरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा आमचा मानस असून त्यांच्या साठी लढण्याची इच्छा ठेऊन उमेदवारी करत असल्याचे ते म्हणाले.

        CAA कायद्यामुळे आमच्या नागरिकत्वावर संशय घेणे हा देशद्रोह आहे. शंभर दोनशे लोकांमुळे संपूर्ण गरीब जनतेस त्रास देणे मला पटले नाही तसेच CAA कायदा हा गरीब जनतेच्या विरोधी कायदा असल्यामुळे मी माझ्या पोलीस अधीक्षक पदाचा राजीनामा दिला असल्याचे ते म्हणाले.

      मी इतर ठिकाणी पण निवडणूक लढऊ शकतो परंतु धुळ्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम पहिले असल्यामुळे इथल्या लोकांशी नाळ जुळली गेली असल्याने येथील जनतेस मी जास्त न्याय देऊ शकतो म्हणून इथून उमेदवारी अर्ज येत्या 2 किंवा 3 तारखेला भरनार असल्याचे अब्दुल रेहेमान या वेळी म्हणाले.

      एका बाजूला सर्व मनुवादी पक्ष आहेते व एका बाजूला न्याया साठी लढाणारा आपला वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे हे लोकांनी ओळखले पाहिजे, लोकांना सामाजिक न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, महिलांसाठी देखील न्याय देण्याचे आम्ही काम करणार आहोत, जनतेमध्ये बंधू भाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, आपल्याला जेवण काही करायचे आहे ते कायद्याच्या व संविधानाच्या चौकटीत राहून करायचे आहे, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता तोच विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे व जनतेने मला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून निवडून द्यावे असे पत्रकार परिषदेत अब्दुल रेहेमान यांनी सांगितले

       भाजपा व काँग्रेस पक्षात चमचे व दलालांना तिकीट दिले जाते जनतेसाठी लढाणाऱ्या गरीब कार्यकर्त्याला तेथे तिकीट मिळत नाही तसेच देशभक्त असल्याचे सर्टिफिकेट कोणीही वाटू नये अशा प्रकारच्या टिकांचा हल्लाबोल भाजपा व काँग्रेस पक्षावर वंचित चे उमेदवार अब्दुल रेहेमान यांनी पत्रकार परिषदेत केला.

Post a Comment

0 Comments