धुळे : पदाधिकारी, कार्यकर्ते व जिप, पं.स सदस्य, नगर सेवक, सरपंच, बुथ प्रमुख, सुपर वाॅरीयर्स यांनी पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक उमेदवार हा नरेंद्र मोदी समजुन प्रचार करावा, आपल्या लोकसभा मतदार संघात नरेंद्र मोदी उभे आहेत असे समजुन सर्वांनी प्रचारात जोमाने कामाला लागावे असे उत्तर महाराष्ट्र विभाग संघटनमंत्री तथा प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांनी आवाहन केले. भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामिण व महानगरची संयुक्त जिल्हा बैठक दि. २५ रोजी राम पॅलेस धुळे येथे भाजपा विभाग संघटनमंत्री तथा प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, धुळे ग्रामिण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचा प्रमुख उपस्थित झाली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धुळे लोकसभा निवडणुक प्रमुख राजवर्धन कदमबांडे, जिप अध्यक्षा सौ. धरती देवरे, धुळे ग्रा. भाजपा जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, डि. एस. गिरासे, अरुण धोबी, सौ. लिलाबाई सुर्यवंशी, माजी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, प्रदीप कर्पे, हिरामण गवळी, बापु खलाणे, ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर, प्रा. अरविंद्र जाधव, भाऊसाहेब देसले, राम भदाणे, प्रा. रविंद्र निकम, देवेंद्र पाटील, किशोर माळी, दिपक बागल, जितेंद्र जैन, विक्रम तायडे, वैशाली शिरसाठ, राजुलाल मारवाडी, जिल्हा पदाधिकारी, विविध आघाड्या, मोर्चा व प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष, जिल्हा संयोजक, मंडळ अध्यक्ष, लोकसभा, विधानसभा निवडणुक प्रमुख, प्रभारी, विस्तारक आदि उपस्थित होते. अनासपुरे पुढे म्हणाले की, गेल्या ६० वर्षांत काँग्रेस सरकारने जे विकासकार्य केले नाही, ते १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले. देशाच्या विकासाला गती, प्रगती आणि समृद्धी देण्यासाठी महाराष्ट्रात शिवशाही आणि भारतात रामराज्य पूर्णपणे स्थापन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी सर्वांनी आपल्या मतदार संघातील उमेदवाराला भरभरून मतदानरूपी आशीर्वाद देऊन विजयी करावे असे आवाहान केले. तर धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले की गेल्या १० वर्षांत धुळे जिल्ह्यात दळण वळण, दूरसंचार, कृषी व औद्योगिक क्षेत्रात पायाभूत विकासकामे झाली व त्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे यांचे मोलाचची भूमिका राहिली असल्याचे सांगत उमेदवार डॉ सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे सांगितले. सुत्रसंचलन श्यामसुंदर पाटील यांनी केले.
Post a Comment
0 Comments