Type Here to Get Search Results !

म्हसदी येथील ग्रामविकास अधिकारीला ५० हजरांची लाच भोवली...

 



ग्रामविकास अधिकारी ५० हजाराची  घेतांना रंगेहात एसीबी च्या जाळ्यात.


धुळे : आरोपी मेघशाम रोहिदास बोरसे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत म्हसदी (प्र.नेर), ता. साकी, जि. धुळे यांनी तक्रारदार यांचेकडुन २,००,०००/- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता ५०,०००/- रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल.

     तक्रारदार हे मौजे म्हसदी (प्र. नेर) येथील रहिवासी असुन त्यांची पत्नी म्हसदी (प्र. नेर) ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. तकारदार यांची पत्नी अशिक्षित असल्याने त्यांच्या वार्डात विकासकामे मंजुर होण्याकरीता त्यांच्या पत्नीच्या वतीने तक्रारदार हे सरपंच व ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांना वेळोवेळी भेटुन पाठपुरावा करीत होते.

     तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेवुन त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वार्डातील उर्दू शाळेस संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व शाळेच्या मुला मुलींकरीता सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळणेकरीता अर्ज देवुन त्यांना विनंती केली असता ग्रामसेवक बोरसे यांनी सदर कामाचे अंदाजपत्रिकेत १२,००,०००/- रुपये किमतीच्या २० टक्क्याप्रमाणे २,४०,०००/- रुपये काम घेणा-या इच्छुक ठेकेदाराकडुन आगाउ कमिशन घेवुन दयावे लागेल असे तक्रारदार यांना सांगितले होते.तक्रारदार यांना ग्रामसेवक बोरसे यांना त्यांच्या मागणी प्रमाणे लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक ०४.०३.२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात समक्ष येवुन तकार दिली होती.सदर तक्रारीची दि. ०७.०३.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आलोसे ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती २,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कमेपैकी ५०,०००/- रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. आज दि.२५. रोजी सापळा आयोजित केला असता ग्रामसेवक बोरसे यांनी तक्रारदार यांचेकडे २,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता ५०,०००/- रुपये म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले त्यांचे विरुध्द साकी पो.स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments