Type Here to Get Search Results !

दोंडाईचा येथील आंबेडकर जयंतीच्या मिरवणूकीला गालबोट लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ; पत्रकार परिषदेतून मागणी.

 


धुळे : दोंडाईचा मध्ये झालेल्या डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत हल्ल्याबाबत अनेक प्रकार निष्पन्न पत्रकार परिषद घेऊन घटने संर्भात अनेक खुलासे करण्यात आले. घटनेचा सखोल तपास व्हावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत (SIT) द्वारे किंवा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे चौकशीची मागणी.

दोंडाईचा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दरम्यान मिरवणुकीत झालेल्या घटने संदर्भात पत्रकार परिषद घेऊन मागिती देण्यात आली कि काही समाजकंटकांनी हल्ला केला त्या हल्ल्यात अनेक नागरिक सह पोलीस निरीक्षक देखील जखमी झाले होते त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्या संदर्भात अपेक्षित न्याय मिळाला नाही त्या ठिकाणी विशिष्ट्य प्रकार चा स्प्रे वापरण्यात आला मिरवणुकीत पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील हल्ला झाला परंतु वाढीव कलम न लावता हल्याचे मोजके कलम लावून त्यांच्यावर मोठी कारवाही झाली नाही असे ह्या पत्रकार परिषद मध्ये सांगण्यात आले.

ह्या ठिकाणी कुठल्याही समाजाच्या मिरवणुका असो कार्यक्रम असो काही मोजके समाजकंटक त्या ठिकाणी त्यांना अडवून हल्ला करतात किंवा वाद निर्माण करतात असे या ठिकाणी सांगण्यात आले.सध्या झालेल्या घटनेत वाढीव कलम का लावण्यात आले नाही…? पोलिसांवर हल्ला तरीही पोलीस प्रशासन मनावर का घेत नाही त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे…? असा सवाल नागरिकांनी केला आहे. ह्या घटनेत एका समाजाला टार्गेट न करता फक्त हल्लेखोर समाजकंटक यांच्यावर मोठी कारवाई होण्यासाठी या संवेदनशील घटनेचा सखोल तपास व्हावा व तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विशेष तपास पथक (SIT ) द्वारे किंवा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे केला पाहिजे व या प्रकरणात पोलिसांनी योग्य कलमे लावले नाही त्याची दखल घ्यावी आरोपींची पार्श्वभूमी तपासून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी व आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली.

Post a Comment

0 Comments