बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) : धुळे महानगर व ग्रामीण शिक्षक लोकशाही आघाडीची (टिडीएफ) सभा कै.आप्पासाहेब भाल्डे शिक्षक भवन येथे जिल्हाध्यक्ष डि.जे.मराठे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
सभेत मार्गदर्शक एस.के.चौधरी,नाशिक विभाग टिडीएफचे अध्यक्ष संजय पवार व टीडीएफचे राज्य कार्यकारिणी सदस्य निशांत रंधे यांनी टिडीएफची पंचसूत्री,कार्य, महत्त्व सांगुन व जुनी पेन्शन योजना,विनाअनुदानित इ.प्रश्नांसाठी टिडीएफ कायम शिक्षकांसोबत आहे असे मत व्यक्त केले.तसेच आजीव सभासद नोंदणी करणे.नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारणे व म.अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर सभेस जिल्ह्यातील संजय पवार,निशांत रंधे,विजय दहिते,शुभांगी पाटील या इच्छुक उमेदवारांनी टिडीएफ तर्फे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज सादर केले आहेत.
टिडीएफ ही शिक्षकांसाठी लढणारी संघटना आहे.नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षकच आमदार असावा कारण शिक्षकांच्या समस्या फक्त शिक्षकच समजू शकतात.असे मत इच्छुक अर्जदार उमेदवारांनी व्यक्त केले .
Post a Comment
0 Comments