Type Here to Get Search Results !

धुळे जिल्हा युवक मध्यवर्ती भीमजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी नाना साळवे यांची सर्वानुमते निवड

 


युवक भीमजयंती उत्सव समितीची बैठक हजारो युवकांच्या उपस्थितीत संपन्न.


धुळे - शहरात दरवर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आंबेडकरी समाजातील युवकांमध्ये वेगळीच ऊर्जा या दिवशी बघायला मिळते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्व जगाला माहिती आहेच त्यामुळे इतर समाजातील देखील युवक या भीमजयंतीमध्ये एकत्र येत भव्य रॅली फाईट ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष पै. नानाभाऊ साळवे यांच्या नेतृत्वात धुळे शहरातून १४ एप्रिल रोजी काढण्यात येते. यावर्षी देखील १४ एप्रिल २०२४ रोजी भव्य रॅलीचे आयोजन कारण्यासंदर्भात युवक भीमजयंती उत्सव समितीची बैठक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमी येथे पार पडली. बैठकीत सर्वानुमते या भव्य अभिवादन रॅलीचा मार्ग ठरवण्यात आला. ही रॅली जुनी पंझरा चौपाटी येथून सुरु होऊन आग्रा रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतल्यास पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होईल. सदर बैठकीला हजारो युवकांनी उपस्थिती लावली होती व सर्वांच्या संगनमताने पै. नानाभाऊ साळवे यांच्या गळ्यात या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली व अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या हाती देण्यात आली. सदर बैठकीत कोणीही भीमजयंती ला गालबोट लागेल असे कृत्य करू नये व या दिवशी कोणीही मद्य पेय पिऊ नये अशा सूचना देखील वरीष्ठानकडून करण्यात आल्या. या बैठकीला अध्यक्ष नानाभाऊ साळवे, जेष्ठ नेते राजसाहेब चव्हाण, वंचित चे नेते ऍड. संतोषआण्णा जाधव, संदेश भूमी चे प्रणेते आनंद सैंदाणे,दैनिक स्वराज्य लक्ष्यचे संपादक देवेंद्र पाटील, उपसंपादक उमाकांत कढरे,ऍड. महेंद्र शिरसाठ,नयनाताई दामोदर, सरोजताई कदम,सामाजिक कार्यकर्ते विनोद केदार,अमोल मोरे,विशाल पगारे,गोविंद गरुड, विजय अहिरे, रामचंद्र अहिरे,योगीराज अहिरे, पप्पू पगारे,मनोज परेराव, योगेश जगताप, योगेश पगारे, सनी वाघ,अजय वाघ, विक्की वाघ,विजय मोरे, बबलू रामराजे सुनील मोरे, कैलास अमृतसागर यांच्या सह मोठ्या संख्येने युवक व महिला वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments