Type Here to Get Search Results !

धुळ्याच्या अवघ्या 5 महिन्याच्या वेदांश सोनगिरेची कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.

 


धुळे : धुळे शहरातील वैभव अनिल सोनगिरे यांचा अवघा 5 महिन्यांचा मुलगा वेदांश सोनगिरे या चिमुकल्याची चांगली स्मरणशक्ती पाहुन त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड जाहीर करण्यात आला असून त्याच्या या कमी वयात बुद्धीचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. त्याच्या या तेज स्मरणशक्तीचा सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.


सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे, पुस्तकी अभ्यासापासून ते दूर होत असून याबाबत अनेक अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली जात आहे. अशात धुळे शहरातील वेदांश हा वैभव व प्रतिक्षा सोनगिरे ह्यांचा मुलगा आणि शहरातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळख असलेल्या अनिल गंगाधर सोनगिरे ह्यांचा नातू आहे. सोनगिरे कुटुंबीयांनी आपल्या मुलाची स्मरणशक्ती ओळखत त्याला विविध गोष्टींचे चित्र दाखऊन ते ओळखायला शिकवले आणि अवघ्या 5 महिन्यांच्या वेदांश सोनगिरे ने ह्या वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली असून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड मंजूर झाला असून धुळ्यातून सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.


वेदांश चे आई आणि वडील यांना लक्षात आले की, वेदांश ला एखादी गोष्ट दाखवली की ती गोष्ट सहज त्याच्या लक्षात राहते त्यानंतर त्यांनी त्याला अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे वेदांश ने त्या सहजपणे आत्मसात केल्या. वेदांशच्या पालकांनी त्याला एबीसीडी, विविध मुळाक्षरे, 16 हून अधिक देशांचे राष्ट्रध्वज, प्राण्यांची नावे, फळे, फुलांची नावे, पक्षी, भाज्या विविध रंग, 1 ते 20 पर्यंत चे नंबर, महापुरुषांच्या माहिती हे सर्व त्याला सांगितले आणि वेदांश हे सर्व काही क्षणातच स्मरणात ठेवले. त्यामुळे पालकांना त्याचे खूप कुतूहल वाटले. टीव्ही आणि मोबाईल पासून मुलांना दूर ठेवल्यास त्यांच्या सुप्त गुणांचा माग घेता येईल अशी आशा वेदांशच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली.



चांगली स्मरण शक्ती असलेल्या चिमुकल्या मुलांसाठी कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड दिला जातो, अशी माहिती वेदांशच्या पालकांना मिळाली. त्याबाबत त्यांनी माहिती घेऊन ऑनलाइन पद्धतीने त्यासाठी नामांकन भरले. त्यावेळी त्यांना वेदांश चे विडिओ देण्याबाबत सांगण्यात आले. त्यांनी वेदांश ला महापुरुषांचे फोटो, भाज्यांचे प्रकार, विविध देशांचे झेंडे ओळखतानाचे व्हिडिओ चित्रित करून पाठवले. वेदांशची तल्लख बुद्धी पाहता, त्याचे नामांकन स्वीकारत अवघ्या 5 महिन्यांच्या असलेल्या वेदांश सोनगिरे ह्या चिमुकल्याची नोंद कलाम वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली असल्याची माहिती त्याच्या आई वडिलांनी यावेळी दिली.




Post a Comment

0 Comments