शेतकऱ्यांची न्याय मिळण्यासाठी पत्रकार परिषद...!
धुळे – धुळे एमआयडीसी साठी जमिनी देणार्या शेतकर्यांना अंधारात ठेवून परस्पर काही उद्योगपती तसेच बिल्डर्स यांच्याशी संगनमत करुन एमआयडीसीचे अधिकारी राखीव ओपन स्पेस ऍमिनिटीचे प्लॉट गिळंकृत करीत असल्याचा गंभीर आरोप संबंधीत शेतकर्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
तसेच हा भुखंड गिळंकृत करण्याचा घाट गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असून याविरुध्द शेतकर्यांनी आवाज उठवत राज्य सरकारने त्वरीत कारवाई करण्याची आणि सदर प्लॉटची वाटप थांबवण्याची मागणी केली आहे.धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात शरद शालीग्राम वाघ, विलास शालीग्राम पाटील, कैलास पोपट पाटील आदी शेतकर्यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. अवधान येथील एमआयडीसी उभारणीसाठी झालेल्या भुसंपादनात विलास शालीग्राम पाटील, कैलास पोपट पाटील, शरद शालीग्राम वाघ, शरद पोपट पाटील, विकास अर्जुन वाघ, रोशन कैलास वाघ, शेखर विकास वाघ, राजेंद्र शालीग्राम पाटील, कृष्णा विलास पाटील, विश्वास बुधाजी पाटील, धर्मराज महादू वाघ यांच्या वडीलोपार्जित जमिनी ३० ते ४० वर्षापुर्वी एमआयडीसीसाठी अधिग्रहीत केल्या गेल्या आहेत. प्रत्येक शेतकर्याचे १० ते १५ एकर जमिनी घेण्यात आल्या आहेत. आणि हे शेतकरी काही वर्षापासून धुळे आर.ओ. ऑफिस मध्ये खेटा मारत असून ऍमिनीटीच्या जागेतील पी.ए.पी.चे प्लॉट ची मागणी करीत आहोत, त्याची ओ.सी. देखील आमच्याकडे आहे.
धुळे एम.आय.डी.सी.येथील एक्स-१ प्लॉटच्या पाठीमागील ऍमिनिटीच्या प्लॉट ज्या प्लॉट मध्ये भुसंपादीत शेतकर्यांना १००-१०० मिटर चे प्लॉट केलेले आहेत. आणि सदर एक्स-१ प्लॉट च्या पाठीमागील ७२० स्के.मि. ची ऍमिनिटीच्या जागेत ५ (पाच) भुसंपादीत शेतकर्यांची मुले हे छोटे छोटे स्टॉल, त्यात पानटपरी, चहा-नाश्तची हॉटेल, किराणा दुकान, पाणी पुरीचा व्यवसाय करुन सद्यस्थितीत त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र ७२० स्के. मिटरच्या ऍमिनिटीच्या जागेची मागणी व तेथील पाडलेल्या छोट्या छोट्या प्लॉटची मागणी ज्यांचा क्रमांक एक्स-६, एक्स-७, एक्स-८, एक्स-९ असा आहे. ते प्लॉट भुसंपादीत आम्ही काही शेतकरी एम.आय.डी.सी.अ आर.ओ. धुळे यांच्याकडून एम.आय.डी.सी.ची जी शासकीय रक्कम आहे ती भरुन हे प्लॉट घेण्यास तयार असतांना देखील काही दिवसांपुर्वी या धुळे एम.आय.डी.सी.चे आर.ओ. अनिल गावीत सर कार्यकारी अभियंता व्यास सर, एरिया मॅनेजर श्रीमती रेखा कोकणी मॅडम व डेप्युटी सी.ई.ओ.क्र.३ मरोळ एम.आय.डी.सी. अंधेरी (पुर्व) मुंबई -९३ हे सर्व अधिकारी यांनी या एक्स-१ प्लॉटच्या पाठीमागील एक्स-६, एक्स-७, एक्स- ८, एक्स-९ या प्लॉटची कुठलीही ई-निवीदा पद्धत न काढता एका बलाढ्य बिल्डर यांना शासकीय किंमत सोडून अतिरिक्त रक्कम घेवून हे प्लॉट परस्पर देण्याचा प्रकार सुरु केला. प्लॉटची २५% रक्कम ह्या बिल्डरने गेल्या १५ दिवसापुर्वी भरली आहे. तरी आम्ही काही भुसंपादीत शेतकरी ज्यांची सद्यस्थिती त्या जागेवर उदरनिर्वाहाची स्टॉल चालू आहेत. म्हणून ही जागा जरी ऍमिनिटीची असेल तरी या जागेसाठी या बिल्डरने जी शासकीय रक्कम भरलेली आहे. त्यापेक्षा जास्तीची शासकीय रक्कम आम्ही भुसंपादीत शेतकरी भरण्यास तयार आहोत. त्यामुळे या बिल्डर ७५% रक्कम भरण्यापुर्वी सदर प्लॉटची अलौंटमेंट त्वरीत थांबविण्यात यावी. अशी मागणी शेतकर्यांनी पत्रकार परिषदेव्दारे केली
Post a Comment
0 Comments