Type Here to Get Search Results !

आंबेडकरी युवकाचा खून करणार?टवाळ खोरांच्या धमक्या

 


भयभीत नागरिकांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षकांकडे धाव.



धुळे : शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सदिच्छा नगर  येथे राहणारे आंबेडकरी समाजाचे युवा कार्यकर्ते अजय वाघ हे त्याभागात वेगवेगळे समाजउपयोगी कार्यक्रम घडवून आणत असतात तसेच रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात हे तेथील अजय राजू अहिरे, लकी राजू अहिरे, गोलू नगराळे, रितिक धर्मा सोनवणे यांना सहन होत नसल्याने ते नेहमी त्या भागात येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतात.त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या व खास करून महिलांच्या मनात अतिशय भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दि.२२/०३/२०२४ रोजी वरील पाच जण व त्यांचे सोबत २५ ते ३० गुंड हे गल्लीत येऊन वाईट वाईट अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून महिलांना पाहून वेगवेगळे हावभाव करून, आरडा ओरड करत हातात लाकडी दांडके, लोखंडी सळई व तलवारी घेऊन घरात घुसून सामानांची नासधूस करत अंजनाबाई वाघ, अरुणाबाई वाघ, पूनम मोरे, मिना मोरे यांना जबर मारहान करून जखमी केले. त्यानंतर सर्वांनी धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत एन. सी. दाखल केली होती. परंतु अद्यापपावेतो सदर गावगुंडाना त्याचा काहीही फरक पडलेला नसून उलट हे टवाळखोर ट्रिपल सीट गाडीवर बसून तेथे फिरत आहेत व त्याभागात हैदोस घालत आहेत तसेच आंबेडकरी समाजाचा युवा कार्यकर्ता असलेल्या अजय वाघ यास जिवंत सोडणार नाही, त्याच्या तंगड्या तोडू, त्याला फेकून देऊ आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही अशा जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. या सर्व प्रकाराच्या मागे या गावागुंडाना राजकीय वरदहस्त असल्याचे देखील परिसरातील नागरिकांनी सांगितले. या प्रकरणामागे नेमके कोण आहे याचा शोध घेऊन या गावागुंडाचा तात्काळ बंदोबस्त करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा व दहशतीच्या वातावरणातून आमची सुटका करावी अशा आशयाचे निवेदन सदिच्छा नगर भागातील नागरिकांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. एस. ऋषिकेश रेड्डी यांना दिले निवेदन देतेवेळी सदिच्छा नगरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.तरी पोलीस यंत्रणा यावर काय पाऊले उचलणार? या कडे सर्वांचे लक्ष्य लागले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments