धुळे :श्री. दत्तात्रय शिंदे यांना गुप्तबातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, साक्री रोड येथील कुमारनगर भागात इसम राकेश भारतलाल रेलन याने त्याचे राहते घरी सुगंधीत विमल पानमसाला गुटख्याची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने साठवणुक केलेली असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पो.नि.श्री. दत्तात्रय शिंदे यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास नमुद बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले. त्यानुसार पथकाने साक्री रोडवर इसम नामे राकेश भारतलाल रेलन याचे राहते घरी गेले असता तो मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राकेश भारतलाल रेलन वय ५५ वर्ष व्यवसाय किराणा दुकान रा. ब्लॉक नं. जी-३ रुम नं. ५ साक्री रोड धुळे असे सांगितले. त्यास नमुद बातमीची हकीगत सांगितली असता त्याने सहमती दर्शविल्याने घराची पाहणी केली असता, घरामध्ये
२,०९,३१६/- रु. किं.चा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुंगधीत विमल पानमसाला व तंबाखु येणे प्रमाणे असा एकुण २,०९,३१६/- रु.किं.चा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला व तंबाखुची इसम नामे राकेश भारतलाल रेलन याने त्याचे राहते घरात चोरटी विक्री करण्याचे उद्येशाने साठवणुक करुन ठेवल्याने त्याचे विरुध्द धुळे शहर पोलीस ठाणे भाग ५ गुरनं १४६/२०२४ भादंवि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.निरी.श्री. दत्तात्रय शिंदे, मा.श्रीकृष्ण पारधी, पबाळासाहेब सुर्यवंशी, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, मच्छिद्र पाटील, संदीप पाटील, संतोष हिरे, तुषार सुर्यवंशी, प्रकाश सोनार, देवेंद्र ठाकुर, कैलास महाजन अशांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments