धुळे (प्रतिनिधी) - महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. याबाबतीत शहरातील "संविधान संरक्षण समितीच्या" मार्फत परिसरातील नागरिकांनी दि.११ मार्च २०२४ रोजी महापालिकेच्या उपायुक्त श्रीमती संगीता नांदुरकर यांची भेट घेतली. आणि निवेदन दिले. धुळे शहरातील सुरत बायपास हायवे जुना बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ प्रभाग क्रमांक १६ मध्ये जवळपास १५ ते २० कॉलन्यामध्ये ऐन मार्च महिन्याच्या पंधरवड्याच्या आतच दुर्भिक्ष अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. हरी ओम नगर, गुजरताई भामरे सोसायटी, नवनाथ नगर, लगडे नगर, आसाराम बापू शाळेजवळील रावेर रस्ता परिसरातील अनेक कॉलनी मध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. आणि परिसरात कुठेही पथदिव्यांची सोय नाही. त्यामुळे पथदिव्यांसाठी स्वतंत्र वीज वाहिनी टाकून स्ट्रीट लाईटची सोय करण्यात यावी, परिसरात तत्काळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा. यासाठी परिसरातील नागरिकांनी धुळे महापालिकेच्या उपायुक्त श्रीमती संगीता नांदुरकर यांची परिसरातील नागरिकांनी संविधान संरक्षण समितीच्या वतीने आणि जेष्ठ कार्यकर्ते आण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या आणि निवेदन दिले. सध्या नागरिकांना मिळेल तिथून पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागत आहे. नकाने तलाव आटल्यामुळे परिसरातील कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे कुपनलिका बंद पडल्या आहे. याचा नागरिकांच्या दैनंदिनावर मोठा प्रभाव पडला आहे. म्हणूनच परिसरात तत्काळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा. आणि मूलभूत नागरी सेवा पुरवाव्यात. असे निवेदन प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या वतीने "संविधान संरक्षण समितीने" धुळे महापालिकेचे उपायुक्त श्रीमती संगीता नांदुरकर यांना निवेदन दिले. याप्रसंगी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक प्रमुख तथा जेष्ठ कार्यकर्ते आण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर दादा खंडारे, आप्पासाहेब एस. यु. तायडे, अग्निवेश अमृतसागर, विमल बागुल, हर्षदा पाटील, विनोद भईसाने, सिताराम निकम, इंदिरा नगराळे, मिलिंद खरात, रेखा खैरनार, रवीना अहिरे, पोर्णिमा चव्हाण, मधुरी वाघ, सविता शिरसाठ, विद्या येवलेकर, बसराज राठोड, संजय पाटील, आशा पवार, हेमराज शिंदे, मनोज मोरे, कल्पेश आखाडे, प्रवीण पाटील, संजय वारुळे, अलकाबाई वाडीले, दिनेश सिंगलदीप, शिवाजी सैंदाणे, सौ. लगडे, कमल जगताप, निसार खाटीक, प्रदीप बागुल, सुभाष पाटील, रोहित लगडे, रवींद्र लगडे, उषाबाई जोशी, मनोहर मोरे, दगडू भामरे, श्रीमती विमल बाविस्कर, राहुल नेतकर, यशवंत बाविस्कर, दगडू पाटील, रेखा वाघ आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments