धुळे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे सरचिटणीस तथा कामगार चळवळीचे नेते मन्साराम गणेश धिवरे अर्थात एम.जी. धिवरे जिभाऊ यांचे दिनांक ६ मार्च २०२४ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले ते ८२ वर्षांचे होते. आज एम.जी.धिवरे यांची धुळ्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वपक्षीय तसेच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
धुळे शहरातील मूळचे रहिवासी असणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा दलीतमित्र एम.जी.धिवरे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेता हरपल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी आज आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त केली. दरम्यान विविध मान्यवरांनी एम.जी.धिवरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या अनेक गोष्टी यावेळी कथन केल्या.
दरम्यान एम.जी.धिवरे यांच्या यांची शोकसभा धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर खरात तसेच डॉ. नागसेन बागुल, किरण गायकवाड, सिद्धार्थ वाघ, बॉबी नागमल, नागिंद मोरे, विशाल पगारे, मनीबाबा खैरनार, जितेंद्र खैरनार, आकाश बागुल, विनोद केदार, योगेश पगारे, मदन बाविस्कर, मनिष दामोदर, अनिकेत दामोदर, सचिन खरात, आकाश कदम, बबलु मोरे, राहुल वाघ, सागर मोहिते, यांनी ही शोकसभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे संपर्कप्रमुख अर्जुन टिळे, आंबेडकरी ज्येष्ठ नेते वाल्मीक दामोदर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, माजी महापौर प्रदीप कर्पे, मुकेश खरात, शिवसेनेचे हिलाल माळी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रणजित राजे भोसले, कोम्रेड एल. आर. राव, अनिल दामोदर, भाजपाचे हिरामण गवळी, रमेश श्रीखंडे, ॲड. विशाल साळवे, ईरशाद जाहगिरदार, राम भदाणे, दरबारसिंग गिरासे, किरण जोंधळे, एस.यु.तायडे, सुनिल बैसाणे, बंटी मासुळे, जोसेफ मलबारी, महेंद्र शिरसाठ, नागसेन बोरसे, देविदास जगताप, शंकरराव थोरात, त्र्यंबक खरात, आनंद शेंगदाणे, संजय आहिरे, नवाब बेग, गौतम गायकवाड, भाजपा चे किशोर जाधव, गौतम पगारे, संजय जवरास, सुधाकर जाधव, मधुकर चव्हाण, ॲड. मधुकर भिसे, दिपक देवरे, भालचंद्र सोनगत, प्रा. विलास चव्हाण, बापु बाविस्कर, ॲड विलास भामरे, शरद वेंदे, रामकृष्ण नेरकर, कपिल दामोदर, डॉ.शरद भामरे, प्रकाश वाघ, ॲड. उमाकांत घोडराज, महेंद्र महाले, दिपक खैरनार, रिपाई महिला आघाडीच्या अध्यक्षा नयना दामोदर, वंदना भामरे, शोभा आखाडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments