धुळे - महानगरपालिकेतील सताधाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे देवपूर चे खड्डेपुर झाले आणि देवापुरवासीयांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.अपघातामुळे अनेकांना गंभीर ईजा देखील झाली.वस्तुतः भूमिगत गटार योजना आणि पाणी पुरवठा योजना राबविताना होणाऱ्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही म्हणून चारी दुरुस्ती आणि रस्ते दुरुस्ती अथवा नुतनीकरण करणे याचे नियोजन करणे आवश्यक होते.मात्र महानगरपालिकेतील सताधाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे हे शक्य होवू शकले नाही.देवपूरवासीयांची ही समस्या लक्षात घेवून आ.फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान आणि मूलभूत सोई सुविधांचा विकास अंतर्गत प्रभाग क्र.१,२,३,४,५ मध्ये सुमारे २० कोटीची कामे मंजूर करून आणली.मात्र मी पण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही या उक्तीप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी या विकास कामात खोडा घातला.सताधाऱ्यांच्या किळसवाण्या विकासविरोधी राजकारणाला भीख न घालता आ.फारुख शाह यांनी रद्द केलेली विकासकामे पुन्हा मंजूर करू आणली.
प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांच्या निवेदनावरून व मागणीवरून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्र.२ तिरुपती नगर येथे गटार व रस्ता काँक्रिटीकरण करणे या ४२ लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्याहस्ते करण्यात आला यावेळी आ.फारुख शाह यांच्या सोबत ,नासिर पठाण,नगरसेवक सईद बेग, डॉ.दीपश्री नाईक,लोकक्रांतीसेनेचे देवेंद्र पाटील,के.एन.बिरारी,तेजस पाटील,प्यारेलाल पिंजारी, ललित पाटील, संजय पाटील, दिनेश चव्हाण, शिवाजी पाटील ,कैलास पाटील ,संतोष खैरनार,भरत पवार ,रघुनाथ बोरसे ,दिलीप बाविस्कर, आत्माराम पाटील ,सुभाष चौधरी ,भटू पाटील ,शरद सोनवणे, दर्शन बाविस्कर ,प्रमोद मोरे, जयवंत सैंदाणे,दिलीप पाटील,कैलास पाटील,डॉ.बापुराव पवार, इंजि.नकुल अहिरराव,मदन कापुरे,नजर पठाण,फैसलआदी उपस्थित होते. अन्सारी,कैसर अहमद,आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments