पुलवामा हल्ल्यातील शहिदांना धुळ्यात माजी सैनिकांनी वाहिली श्रद्धांजली.
धुळे : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज ४ वर्ष पूर्ण झाले. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्या शहीद जवानांना आज धुळ्यातील शहीद अब्दुल हमीद स्मारकाजवळ माजी सीआरपीएफच्या जवानांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज १४ फेब्रुवारी रोजी ५ वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या शहीद जवानांना माजी सैनिकांनी श्रद्धांजली वाहत १४ फेब्रुवारी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करावा आणि काळा दिवस म्हणून पाळण्यात यावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात केली.
दरम्यान शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहताना जवानांनी यावेळी राजकीय नेत्यांवर सडकून टीका देखील केली. त्यांनी माजी सैनिक शबाब खाटीक यांनी बोलताना सांगितले की, ज्या वेळेस जवान शहीद होता तेव्हाच राजकारण्यांना त्यांनी आठवण होते आणि फोटो काढून शहीद जवानांना विसरून जातात. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी पुलवामा घटनेत शहीद जवानांच्या लाभ घेतला, आणि त्यानंतर त्यांना विसरून गेले असा गंभीर आरोप माजी सैनिकांनी यावेळी केला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या वेळेस सीआरपीएफ जवान सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सारख्या जवानांना ज्या सुविधा मिळतात त्या मिळत नाही, तसेच आमच्या अनेक मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही यापुढे सक्तीने पुढे पाऊल उचलावी लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.याप्रसंगी अध्यक्ष- धनराज बोरसे, सदस्य - मच्छिन्द्रनाथ माळी,एम. आर. कोळी,नरेंद्र पाटील, रमेश निकम,आर. बी. भामरे, चंद्रकांत पाटील,संजय पाटील, मिलिंद पाटील, दिनेश साळुंखे,शबाब खाटीक, सचिन मंगळे,मनोज माळी , राजेंद्र पाटील, विशाल साळुंखे, उत्तम बिरारे रोहिदास पाटील,विजय पाटील अशोक कोळी, प्रवीण मोरे, गोपाल देवरे आदी उपस्थित होते .
बाईट: शबाब खाटीक, माजी सीआरपीएफ सैनिक
Post a Comment
0 Comments