Type Here to Get Search Results !

विनोद वाईन शॉप स्थलांतरीत झाले नाही तर भीम आर्मी आंदोलन करणार - संजय चव्हाण

 







धुळे ( स्वराज्य लक्ष्य. कॉम )- बस स्टँड रोड जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील असलेले विनोद वाईन शॉप हल्ली  १० दिवसांसाठी मा. जिल्हाधिकारी धुळे यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम १४२ नुसार अनुज्ञप्ती बंद करण्याबाबत आदेश पारित केलेले आहेत.दरम्यानच्या कालावधीत मा. जिल्हाधिकारी धुळे, मा.पोलीस अधीक्षक धुळे व अधीक्षक दारूबंदी उत्पादन शुल्क धुळे यांनी अनुज्ञप्ती धारकास बोलावून त्यांच्याशी चर्चा करून अनुज्ञप्ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ५० मिटर अंतरापेक्षा जास्त अंतरावर इतर ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याबाबत प्रास्ताविक करावे असे मा. ना. शंभूराजे देसाई, दारूबंदी उत्पादन शुल्क, मंत्री यांनी आदेश दिलेले आहेत.
     या आदेशाचे पालन करून अनुज्ञप्ती धारक यांनी १० दिवसानंतर स्थलांतरीत केले नाही किंवा त्याच जागेवर दुकान सुरु केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य राखले जावे म्हणून व आंबेडकरी समाज बांधवांच्या भावानांचा उद्रेक होऊ नये म्हणून  भीम आर्मी धुळे जिल्हा युनिट मार्फत सनदशीर मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे पत्रक भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, राजाभाऊ उमाळे, उत्तमराव झनके,किशोर उशीरे,मुलचंद शिरसाठ, समाधान मोरे,वसीम शेख,संजय बागुल, दिलीप अहिरे, ज्ञानेश्वर खैरनार, बबन बागुल यांनी पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकावर प्रसिद्धीस दिले आहे.

Post a Comment

0 Comments