धुळे ( स्वराज्य लक्ष्य. कॉम ) - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देश व विदेशामध्ये साजरी केली जात आहे, तामिळनाडू राज्यामध्ये देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष झाल्याचे बघावयास मिळाले आहे.
धुळ्यातून तामिळनाडू राज्यात देवदर्शनासाठी गेलेल्या शिवप्रेमींनी तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यात मिनाक्षी देवी मंदिराचे दर्शन घेत असताना, त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेल्या हॉटेलमध्ये धुळ्यातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व मूर्ती दिसली त्यांनी हॉटेल मालकास शिवजयंती साजरी करण्याची विनंती करत धुळ्यातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करत शिवजयंती साजरी केली. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी होत असून धुळ्यातील तरुणांनी देखील तामिळनाडू राज्यामध्ये ही शिवजयंती साजरी केली असून शिवप्रेमींसाठी ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे, विजय फुलपगारे, कार्तिक सोनवणे, भूषण फुलपगारे,राहुल वाडीले, कृष्णा फुलपगारे, साई फुलपगारे, यश फुलपगारे,भूषण फुलपगारे, प्रफुल वाडीले, मोहित फुलपगारे, आमित ढोले अशिया तरुणांची नावे आहेत.
Post a Comment
0 Comments