Type Here to Get Search Results !

काँग्रेसच्या सभेत सुशिलकुमार पावरा यांच्या उमेदवारीची चर्चा

 


काँग्रेस ने मागितला बिरसा फायटर्सचा पाठिंबा


नंदुरबार: आगामी लोकसभेच्या तयारीसाठी जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाकडून नुकतीच तालुका पातळीवर सभा घेण्यात आली.या सभेत बिरसा फायटर्सचे अधिकृत उमेदवार सुशिलकुमार पावरा यांच्या कामाची व नावाची चर्चा करण्यात आल्याचे वृत्त आहे.काँग्रेस पक्षाकडून अक्कलकुवा व अक्राणी मतदारसंघाचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी के.सी.पाडवींबद्धल नाराज असलेला गट काँग्रेस पक्षातच दिसून येत आहे.त्या नाराज गटामुळेच नंदूरबार जिल्हा परिषदला भाजप व काँग्रेस युतीची सत्ता आहे.काँग्रेसच्या काही नाराज जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेऊन विजयकुमार गावित यांनी आपल्या स्वतःच्या मुलीला सुप्रिया गावित यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर बसवले आहे.नंदूरबार जिल्ह्य़ात काँग्रेस व भाजप अशी सत्तेसाठी विचित्र युती जगजाहीर आहे.या युतीमुळे भाजप व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर जनतेचा विश्वास कमी झाला आहे.भाजप व काँग्रेस स्थानिक नेत्यांचा सोशल मिडीयावर जोरदार विरोध सुरू आहे. अशा वातावरणात आगामी लोकसभा निवडणूकीत बिरसा फायटर्सने नंदूरबार लोकसभेसाठी सुशिलकुमार पावरा नावाचा आपला तगडा व दमदार उमेदवार जाहीर केल्यामुळे भाजप व काँग्रेस इच्छुक उमेदवारांत मोठी  भिती निर्माण झाली आहे.

               नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले असले तरी  काँग्रेस पक्षाला तसा लायक उमेदवार शोधावा लागणार आहे.काँग्रेसचे अक्राणी अक्कलकुव्याचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी  ३५ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या असली या गावात सुद्धा जायला रस्ता केला नाही,मंत्री असताना काँग्रेस कार्यकत्यांचीच कामे केली नाहीत ,तो माणूस काय जिल्ह्य़ाचा विकास करेल? के.सी.पाडवींच्या अक्राणी व अक्कलकुवा मतदारसंघात अद्यापही  खड्डेमय रस्ते आहेत. काँग्रेस पक्षाला मानणारे व के.सी.पाडवीला विरोध करणारे युवक वर्ग मोठ्या संख्येने आहेत. अशा वातावरणात मतदारांचा तीसरा पर्याय म्हणून बिरसा फायटर्सचे नंदूरबार लोकसभेचे उमेदवार सुशिलकुमार पावरा यांच्या नावाला जनता पसंत करीत आहेत. काँग्रेसचा जिल्ह्यात विरोधकांना टक्कर देऊ शकेल,असा चेहरा नसेल तर बिरसा फायटर्सच्या सुशिलकुमार पावरा यांनाच काँग्रेसने  उमेदवारी द्यावी,अशी मागणी काही कार्यकर्ते करीत आहेत.जिल्ह्यातील भाजप उमेदवाराला बिरसा फायटर्सचे सुशिलकुमार पावरा हेच पराभूत करू शकतात,असा जनतेतून सूर निघत आहे.

              काँग्रेस पक्षातून आमदार के.सी.पाडवी,माजी आमदार पद्माकर वळवी,पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवी,नवापूरचे आमदार शिरीष नाईक, माजी जि.प .अध्यक्षा रजनी नाईक हे  लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बिरसा फायटर्सचा पाठिंबा मागितला आहे.यावर  'आम्ही के.सी.पाडवी यांना मतदान करणार नाहीत व पाठिंबाही देणार नाहीत', अशी स्पष्ट भूमिका बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी सांगितली आहे.



Post a Comment

0 Comments