Type Here to Get Search Results !

वाडी येथील १५८ पीडितांच्या प्रश्नाबाबत सरकारने सकारात्मक विचार न केल्यास जलसमाधी घेणार - सुवर्णसिंग गिरासे

 


धुळे ( दै. स्वराज्य लक्ष्य ) - वाडी ता. शिंदखेडा येथील महाराष्ट्र शासनाच्या वाडी धरण प्रकल्पात घरे, जमीनी गेलेले १५८ कुटुंब गेल्या २० वर्षे पासून प्रशासनाकडे न्याय मागत आहे. तरी देखील प्रशासन पीडित कुटुंबीयांच्या घरे, जमीनींचा मोबदला देऊन पुनर्वसन करत नाही. 

         महाराष्ट्र शासन वाडी धरणग्रस्त जनतेच्या हितासाठी असलेल्या पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी करण्याचे सोडून सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करीत असून १५८ कुटुंबांना वाऱ्यावर सोडलेले दिसून येते.

            यापुढे मात्र शासनाने वाडी गावकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा शासनाने आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आता पीडित १५८ कुटुंबांना हा अन्याय सहन करण अशक्य होत चालले आहे.

                 वाडी धरणग्रस्त पीडित कुटुंबांना त्वरित न्याय देऊन पुनर्वसन चा मार्ग मोकळा न केल्यास दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी समस्त १५८ कुटुंब प्रमुख वाडी धरणाच्या जलाशयात जलसमाधी घेऊ असा इशारा वाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच सुवर्ण सिंह गिरासे यांनी माध्यमांशी बोलतांना दिला.

            यावेळी वाडीगावाचे  लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे, ललित गिरासे, दिलीप शेळके, मोहन सिंग गिरासे, अमृत अहिरे, सुनिल मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments