Type Here to Get Search Results !

देशी दारूवाला पुष्पा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात....!




 श्री. दत्तात्रय शिंदे यांच्या निदर्शनात आले असता चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीत जामचा मळा येथे स्टॉर मोटार गॅरेज समोर मालवाहतुक छोटा हत्ती वाहन उभी असून तिच्या तळाशी पुष्पा चित्रपटासारखे  बॉक्स असून त्यामध्ये बनावट दारुच्या बाटल्या भरल्या असल्यावाचत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो. निरी.श्री. दत्तात्रय शिंदे, स्थागुशा यांनी लागलीच स्थागुशा धुळे येथील पथकास सदर ठिकाणी जावुन पुढील कारवाई करणं बाबत आदेशीत केले.

 सदर पथकाने  नमुद बातमीप्रमाणे वाहनाजवळ जावुन इसम नामे चंद्रप्रकाश गहींदल पाटील वय ५५ व्यवसाय मजुरी रा. प्लॉट नं. ९०, पदमानाभ नगर, मोगलाई धुळे यास ताब्यात घेवुन विचारपुस करता, त्याने सांगितले की, २) नारायण माळी ३) श्रीराम बाबर , ४) महेंद्र शिवाजी चौधरी रा. साक्री जि.धुळे हे बनावट देशी दारु बनवित असुन त्यांचे सांगितल्यानुसार मी सदर बनावट देशी दारु वाहनात भरुन त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहच करीत असतो बावत सांगितले. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी करता, वाहन रिकामे स्थितित दिसुन आले, वाहनाच्या पृष्ठभागाचा पत्रा सरकवून पाहता त्याखाली एक मोठा पत्रटी बॉक्स केलेला दिसला सदर बॉक्स पाहता त्यात खालील नमुद वर्णनाचा व किंमतीच्या बनावट देशी दारुच्या प्लॅस्टिक व काचेच्या बाटल्या मिळून आल्या.

एकुण ३,०२,४४०/- रु. किंमतीचा बनावट देशी दारुच्या बाटल्या वरील नमुद इसमाचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे भाग ५ गुरनं. ३२८.३४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री. श्रीकांत धिवरे साो, पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे स्थागुशा धुळे, गणेश फड,संजय पाटील. श्याम निकम, मच्छिद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, प्रकाश सोनार, संतोष हिरे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, तुषार सुर्यवंशी, प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, प्रशांत चौधरी अशांनी सदरची कारवाई केलेली आहे.

Post a Comment

0 Comments