धुळे - दिनांक २५/१२/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास श्री. मोहम्मद कमरोद्दिन मोहम्मद अजीजउल्ला कुरेशी राहणार १२९,मिसबा मशिद जवळ, अंबिका नगर धुळे यांचे राहते घरातून त्यांचा १३ हजार रुपये किमतीचा विओ कंपनीचा टीटू प्लस ५ जी मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला त्यावरून त्यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने त्या तक्रारीवरून गुरनं ६/२०२४ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणात असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री.श्रीकांत धिवरे व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे यांनी विशेष लक्ष घालून मोबाईल चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सूचना दिल्यात त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विशेष मोहीम राबवून कबीर युसुफ काझी रा. चाळीसगाव रोड गजानन कॉलनी,धुळे हा मोबाईलची चोरी करत असल्याची खात्रीलायक माहिती दत्तात्रय शिंदे यांना मिळून आली व त्यांच्याकडे T2 क्स 5G काळया रंगाचा १३०००/- रुपये किमतीचा , एम.आय. कंपनीचा गोल्डन कलरचा १००००/- रुपये किमतीचा, एम. आय. A2 कंपनीचा लाल रंगाचा १५०००/- रुपये किमतीचा, एम.आय.नोट 5 कंपनीचा सिल्वर रंगाचा १५०००/- रुपये किमतीचा, ओप्पो एफ 11 कंपनीचा निळ्या रंगाचा २००००/- रुपये किमतीचा, एम. आय.कंपनीचा पांढऱ्या रंगाचा १५०००/- रुपये किमतीचा, ओप्पो कंपनीचा काळया गोल्डन रंगाचा १००००/- रुपये किमतीचा, ओप्पो काळा रंगाचा १००००/- रुपये किमतीचा, रेडमी ए ६ कंपनीचा रोज गोल्डन कलरचा १००००/- रुपये किमतीचा, आयटेल ए 46 कंपनीचा निळ्या रंगाचा १५०००/- रुपये किमतीचा, विवो कंपनीचा निळ्या रंगाचा १००००/- रुपये किमतीचा, सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा १५०००/-रुपये किमतीचा, ओप्पो कंपनीचा सिल्वर रंगाचा १००००/- रुपये किमतीचा, एम.आय.कंपनीचा काळया रंगाचा १००००/- रुपये किमतीचा व एम.आय.कंपनीचा निळ्या रंगाचा १००००/- रुपये किमतीचा असे वरील गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल व इतर एकूण १५ मोबाईल मिळून आले. सदर मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीताचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे चे पथकाने छडा लावून आरोपीतास लागलीच ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा.श्री.श्रीकांत धिवरे व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोसई प्रकाश पाटील, असई शाम निकम, पोहेकॉ सुरेश भालेराव, पोहेकॉ पंकज खैरमोडे, पोना रविकिरण राठोड , पोकॉ गुणवंत पाटील, पोकॉ सुशील शेंडे, पोकॉ निलेश पोतदार, पोकॉ अमोल जाधव अशांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments