Type Here to Get Search Results !

धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्त विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन.

 


धुळे - शहरातील विविध परिसरातील महाविद्यालयीन युवक युवतींना मार्गदर्शन व्हावे म्हणून पोलीस रेझिंग डे निमित्त महाविद्यालयीन युवक युवतींसाठी प्रेरणादायक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा व करियर गायडन्स क्षेत्रातील तज्ञ अनुभवी असे वक्ता/ मार्गदर्शक  श्री यजुर्वेद महाजन, दीपस्तंभ फाउंडेशन, जळगाव यांचे मार्गदर्शन धुळे पोलीस दलातर्फे दिनांक ०४/०१/२०२४ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आले होते.

       श्री महाजन यांनी आपल्या बोधकथा व मराठी, हिंदी, इंग्रजी, अहिराणी अशा भाषांचा सुरेख वापर करून युवकांना जीवनातील कष्टाचे महत्त्व समजावून दिले, त्याचप्रमाणे मोबाईल,सोशल मीडिया यापासून अंतर राहिले पाहिजे फक्त अभ्यासाच्या उपयोगाकरिताच या गोष्टींचा वापर करावा याबाबत समजावून सांगितले, त्याचप्रमाणे जीवनात स्पर्धेचे महत्त्व दिव्यांग व्यक्ती बाबत संवेदना बाळगणे, जीवनात कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या व्यक्तीला कोणीच अडवू शकत नाही, कुठल्याच परिस्थितीत त्याला थांबवू शकत नाही याबाबतची उदाहरणे दिली नंदुरबारचे माजी जिल्हाधिकारी व धुळे चे सुपुत्र डॉ.भारुड यांचे उदाहरण  युवकांना दिले त्याचप्रमाणे जळगाव येथे दीपस्तंभ ॲकेडमी व मनोबल संस्था यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक युवक, युवती, दिव्यांग यांची उदाहरणे दिली तसेच यावेळी दृकश्राव्य (Audio Video) माध्यमाचा प्रभावी वापर केला गेला.

       सदर कार्यक्रमासाठी शहरातील जवळपास २२ कॉलेजचे ७५० विद्यार्थी व प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.

        वरील प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांनी मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी देखील युवकांना मार्गदर्शन करतांना स्वतःच्या जीवनातील अनुभव कथन करत युवकांना प्रेरणा दिली. तसेच श्री यजुर्वेद महाजन  या प्रभावी मार्गदर्शकास वक्ते म्हणून बोलविण्या बाबत अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे यांची संकल्पना होती. त्यांनी देखील प्रास्ताविक करताना युवकांना मार्गदर्शन केले. तसेच शिरपूर येथे देखील वरील कार्यक्रम दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी व शहरातील सर्व प्रभारी अधिकारी हजर होते.

        सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) श्री धनंजय पाटील, रा.पो.नि. श्री मुकेश माहुले, भरोसा सेलच्या महिला सपोनि श्रीमती मीना तडवी, मुख्यालयाचे पोहेकॉ श्री राजा पटेल यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी उपस्थित युवक युवतींना पोलीस प्रशासनातर्फे अल्पोहार देखील देण्यात आला.

         एकंदरीत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांचे युवकांना पोलीस प्रशासनाकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यात गेल्या १ ते २ महिन्यापासून  सांगली, शिरपूर तालुका अंतर्गत आदिवासी समाजातील युवकांना पोलीस भरती मार्गदर्शन व निजामपूर येथे देखील तसाच कार्यक्रम त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक युवक युवती देखील पोलीस खात्यात भरती व्हावे यासाठी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन तसेच मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाणे धुळे व ॲड. चैतन्य भंडारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. दिनांक ८/१/२०२४ रोजी विद्यार्थ्यांना पोलीस मुख्यालय धुळे येथे शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याचा देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments