महामार्गावर वाहनधारकांकडून लूट करणारे चार पोलीस कर्मचारी नियंत्रण कक्षात जमा
धुळे - राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे उकळणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात हलवले आहे.
धुळे पोलीस अधीक्षक धिवरे यांना खाजगी वाहनधारकांनी अवैध वसुली होत असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी स्वतः पडताळणी करण्यासाठी खाजगी वाहणातून सोनगीर व धुळे तालुका हद्दीत पाहणी केली असता चार पोलीस कर्मचारी अवैधरित्या वसुली करतांना मिळून आल्याने पोलीस अधीक्षक धिवरे यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करत संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांकडून याबाबत खुलासा मागावीला आहे.तसेच सोनगीर पोलीस ठाण्याचे चालक तथा उपनिरीक्षक प्रमोद मधुकर ठाकरे यांची मोटार परिवहन विभागात तर शिपाई सिराज सलीम खाटीक यांची नियंत्रण कक्षात व धुळे तालुक्याचे दीपक गुलाबराव पाटील यांना नियंत्रण कक्षात तर चालक वसंत नरहर वाघ यांना मोटार परिवहन विभागात नेमणूकीचे आदेश केले आहे.ठाकरे आणि वाघ यांचा जनतेशी संबंध येईल असे कर्तव्य त्यांना देऊ नये असे देखील पोलीस अधीक्षक यांनी बजावले आहे.
Post a Comment
0 Comments