Type Here to Get Search Results !

चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत चालणारा जुगार अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त.

 


धुळे - दिनांक ०८/०१/२०२४ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री धीरज महाजन साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की पवन नगर भागात महादेव मंदिराच्या जवळ एका पडक्या घराच्या आडोशाला काही इसम हे ५२ पत्त्यांच्या कॅटवर तीन पत्ती नावाचा हारजीतचा जुगाराचा खेळ खेळत आहेत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पाथरवट व इतर स्टाफ यांना आदेशित केले.

       पो.हे.कॉ. पाथरवट यांनी सोबत स्टाफ व पंचासह सदर ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे खात्री करिता पवन नगर भागात महादेव मंदिराजवळ एका पडक्या घराच्या भिंतीच्या आडोशाला काही इसम हे ५२ पत्त्यांच्या कॅटवर तीन पत्तीचा हारजीतचा जुगाराचा खेळ खेळताना व खेळवितांना मिळून आल्याने त्यांना छापा कारवाई करून पकडले असता त्यातील काही इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले जागेवर जे एस एम मिळून आले त्यांचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव १) आकाश प्रवीण सोनवणे रा .सहजीवन नगर धुळे २) जमीन रशीद अन्सारी रा. स्लॉटर हाऊसच्या मागे धुळे ३) अश्फाक गुलाब सय्यद रा. जामचा मळा धुळे ४) आयाज लतीफ शेख रा. पवन नगर धुळे ५) यशवंत हिम्मत भदाणे रा. लामकाणी असे सांगितले त्याचप्रमाणे सदरचा अड्डा हा ६) शरद परशुराम लाडे ( फरार ) त्याचे साथीदारांसह चालवीत असल्याचे सांगितले .मिळून आलेल्या आरोपीतांची झडती घेतली असता व जुगारावर लावलेले रुपये ५३,३००/- रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साधने मिळून आल्याने पोहेकॉ पाथरवट यांनी पंचांसमक्ष कारवाई करून जप्त केले असून त्यांच्यावर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे , मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे ,मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री. एस ऋषिकेश रेड्डी धुळे शहर विभाग धुळे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. धीरज महाजन, पोसई. विनोद पवार ,असई. पाटील ,पोहेकॉ. सुनील पाथरवट, पोहेकॉ .निलेश देवरे, पोकॉ .स्वप्निल सोनवणे व चालक पोकॉ.योगेश पाटील अशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments