धुळे - मा .पोलिस अधीक्षक धुळे यांना धुळे जिल्ह्यात वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना अँलीपॅथी औषध साठा बाळगून, रुग्णांवर उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणारे व बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात याव्या अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्याच अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक धुळे यांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दिनांक 4 /1/2024 रोजी धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांना छापा टाकून तपासणी केली असता वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना अँलीओपॅथी औषधी साठा व साहित्य ( त्यात इंजेक्शन, सलाईन व गोळ्या ) बाळगून रुग्णांवर उपचार करणारे असि तबसूम बिश्वास - वय ५० वर्ष रा. वर्सा ता. साक्री जि.धुळे, संभाजी माधवराव सोनवणे - वय ७० वर्ष रा.उंमरे ता. साक्री जि.धुळे,योगेश चंद्रकांत पाटील - वय २४ वर्ष रा. गोपाल नगर महावीर भवन जवळ पिंपळनेर, विजयसिंह धुडकु बडगुजर - वय ५२ वर्ष रा. बन्सीलाल नगर शिरपूर, समर विजय बिस्वास - वय ४७ वर्ष रा. अकोला पो.अमळा काशीपूर ता हाबडा जि. नारथे प्रगोना पश्चिम बंगाल ह. मु. सोनगीर ता.जि. धुळे, धिरज रोहिदास अहिरे - वय ३३ वर्ष मोतीवाला होमिओपॅथिक गंगापूर रोड नाशिक ह.मु. जुने भामपुर अशा एकूण सात बोगस डॉक्टरांवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांबाबत काहीही माहिती असल्यास पोलीस विभागा कडे देण्यात यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व सदरच्या डॉक्टरांवर कठोर पावले उचलण्यात येईल असे आवाहन पोलीस विभागातर्फे प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments