काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना काळ हा खूप भयंकर होता त्याचप्रमाणे त्याचा प्रकोप धुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात होता अशा वेळेस धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे हॉस्पिटल येथे कंत्राटी कर्मचारी भरण्यात येत होते परंतु अशा भयानक महामारीत कोणीच काम करायला तयार नव्हते परंतु अशा वेळेस जीवाची परवा न करता कोरोना योद्धा म्हणून येथे रुजू होते . रुग्णाचे डायपर चेंज करण्यापासून ते त्याची पूर्ण देखभाल डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. व संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना मुक्त धुळे जिल्हा हा प्रथम आला. परंतु आज ज्या कोरोना योद्धांमुळे धुळे जिल्हा प्रथम आला व आमची अवस्था खूप बिकट आहे कोरोना संपल्यापासून आम्हाला कामावरून काढण्यात आले असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आम्ही अनेकदा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, आमदार, ग्रामीण आमदार, नगरसेवक, व तुमच्या गटाचे कार्यकर्ते यांना शेकडो निवेदन देऊनही आमची कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप देखील करण्यात आला. आमची मागणी फक्त भाऊसाहेब हिरे वैद्यकीय हॉस्पिटल येथे आम्हाला कामावर कायम रुजू करून घ्या एवढीच आहे भाऊसाहेब हिरे हॉस्पिटल येथे कर्मचारी नसल्याने अवस्था खूप बिकट आहे. आम्हाला कामाचा मोठा अनुभव असल्यामुळे या भरतीत किंवा किंवा सरळ सेवेत सामावून घ्या असे या निवेदनात सांगण्यात आले.
Post a Comment
0 Comments