कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक धिवरे व पी.आय शिंदे
यांचे मानले आभार...
धुळे - मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, धुळ्यातील पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, एलसीबीच्या पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आकाश सोनवणे यांना त्यांचा हरवलेला मोबाईल परत मिळून दिला आहे. त्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद पत्रकार आकाश सोनवणे यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला आहे....
गेल्या सहा महिन्यापूर्वी पत्रकार आकाश सोनवणे हे काही कामानिमित्त शहरातील दसेरा मैदान या ठिकाणी गेले होते. तिकडून परत येत असताना त्यांच्या खिशातून विवो कंपनीचा तीस हजार रुपये किमतीचा स्मार्टफोन खाली पडला. याची कल्पना आकाश सोनवणे यांना नसल्याने ते सरळ घरी निघून आले. मात्र घरी आल्यावर त्यांना संशय आला की? मोबाईल हरवला, किंवा चोरीला गेला. यावरून आकाश सोनवणे यानी मोबाईल साठी शोधा शोध केली मात्र मोबाईल कुठेही मिळून आला नाही. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवून घेतली. मात्र या तक्रारीला सहा महिन्याचा कालावधी लोटला गेला. याची माहिती त्यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व एलसीबी चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दिली.
यावरून एलसीबी चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेला मोबाईलचा शोध घेऊन 24 तासाच्या आत पत्रकार आकाश सोनवणे यांना परत मिळून दिला.
सदर हा मोबाईल एका अज्ञात व्यक्तीला सापडला होता व त्याचा वापर तो करत असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून त्याचा शोध घेऊन या पिढीत पत्रकाराला मोबाईल मिळवून दिला. सदर हरवलेला मोबाईल परत मिळाल्याचे पाहून पत्रकार आकाश सोनवणे यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचे आभारही मानले.आहे. त्यांच्यासमवेत यावेळी पत्रकार दीपक वाघ, व दिनेश निकुंभ उपस्थित होते....
Post a Comment
0 Comments