धुळे - गुटखा विक्री व अवैध धंद्यांना समर्थन देऊन युवकांना व्यसनाधीन करून त्यावर तुमच्या भिकारी राजकारणाची पोळी भाजून अनेक पिढ्या बरबाद करण्याचा विचार करत असाल तर खबरदार असा इशारा आर पी आय आंबेडकर गटाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश राज निकुंभ यांनी खुल्या पत्रामध्ये दिला आहे.
धुळे शहराची ओळख अनेक वर्षापासून येथील होणाऱ्या दंगली, अवैध धंदे, होणारे मर्डर , वाढती गुन्हेगारी याच कारणामुळे आहे आणि याला कारणीभूत सुध्दा येथीलच राजकारणी पुढारी आहेत. मुलांना कमी वयात पार्टी च्या बहाण्याने व्यसनाधीन करायचे २-४ वाढदिवसाचे फुकटचे बॅनर लाऊन त्याला त्याच्या एरीया चा भाई बनवायचा आणि त्यांच्या सोबत अजून ८-१० युवकांच्या आयुष्याची वाट लावून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रात आणून आपल्या भिकारी राजकारणाची पोळी भाजायची.
त्यानंतर धुळे जिल्ह्यात कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी मा. अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे, प्रभारी पोलीस अधीक्षक मा. ऋषीकेश रेड्डी यांच्या सारखे दबंग अधिकारी धुळे जिल्हा गुन्हेगारी मुक्त, व अवैध धंदे मुक्त करण्यासाठी आलेले असल्यावर त्यांना सहकार्य करण्याचे सोडून असे काही पुढारी ज्यांना समाज विचारत नाही असे युवकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे अशा कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी कुठे कारवाई केल्यावर त्यांचे कौतुक करण्याचे सोडून त्याच अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात की आमच्या माणसावर कारवाई करायची नाही नाही तर गाठ माझ्या सोबत आहे.
नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या निवेदना नंतर बस स्थानक परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशावरून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यानंतर त्या कारवाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन देणे सोडून उलट त्यांना खुल्या पत्राव्दारे धमकावून त्यांच्या वर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचे अवैध धंदे करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना पण जनता सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे धुळे शहरात श्रीकांत धिवरे , अभिनव गोयल, ऋषीकेश रेड्डी सारखे कर्तव्य दक्ष व युवा डॅशिंग अधिकारी जेव्हा पासून आले आहेत तेव्हापासून गुटखा तस्करी, अवैध दारू, अवैध धंदे बंद करून शहरातील मोठ मोठे दादा भाई पहेलवान सर्व आपआपल्या बिळात जाऊन शांत बसलेले दिसत आहेत.
पण या राजकीय पुढारींना हे धुळे शहर गुन्हेगारी मुक्त करून या दबंग अधिकाऱ्यांनी शांत केलेले बघवत नसावा. म्हणून कारवाई केली म्हणून त्यांना धमकविण्याचे धंदे यांनी चालू केलेले दिसत आहे.पण या राजकीय पुढाऱ्यांना एकच सांगणे आहे. यापुढे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर याद राखा तुमचे नाव प्रत्येक वृत्तपत्रात व न्यूज चॅनेल ला प्रकाशित करून तुमचा खरा चेहरा जनते समोर दाखवला जाईल की धुळे शहरात युवकांना गुन्हेगार बनवून अवैध धंदे ला कोण प्रोत्साहन देतात. तेव्हा जनताच तुम्हाला तुमची लायकी येणाऱ्या निवडणूक मध्ये दाखवेल असा इशारा आर पी आय आंबेडकर गटाचे धुळे जिल्हा अध्यक्ष दिनेश राज निकुंभ यांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments