Type Here to Get Search Results !

दुकानदाराला नायलॉन मांजाची चोरटी विक्री करणे भोवले

 


३०,१८०/- रुपये किंमतीचा नायलॉन मांजा व नायलॉन              मांजा तयार करण्याची बनवट मशीन जप्त.


शिरपूर - दिनांक १४/०१/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिरपूर येथे वडगल्लीतील महावीर प्रोव्हिजन दुकानात हरीश हंसराज जैन रा. रथगल्ली वरचे गाव शिरपूर जि. धुळे हा इसम संक्रात सणाच्या दिवसात पतंग उडविण्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची चोरटी विक्री करत आहे.

     त्यावरून पोलीस निरीक्षक आगरकर, पोउनि.संदीप मुरकुटे व संदीप दरवडे तसेच शोध पथकाचे अंमलदार व दोन पंच अशांनी महावीर प्रोव्हिजन या दुकानात जाऊन हरीश हंसाराज जैन वय ५२ हा शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास बंदी घातलेली असतांना देखील तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून एकूण ३०,१८०/- रुपये किंमतीचा मांजा मालाची चोरटी विक्री करण्यासाठी बाळगतांना मिळून आल्याने त्याच्यावर छापा टाकून त्यास मालासह ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध शोध पथकाचे पोकॉ.मनोज महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पर्यावरण कायदा सन १९८६ चे कलम ५,१५ सह भांदवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

     सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर,पाउनि. संदीप मुरकुटे, संदीप दरवडे व शोध पथकाचे पोहेकॉ. ललित पाटील, पोना.रवींद्र आखडमल,पोकॉ.योगेश दाभाडे,प्रशांत पवार,आरिफ तडवी, भटू साळुंके, विनोद आखडमल,मनोज महाजन, सचिन वाघ,मनोज दाभाडे, गोविंद कोळी व चापोकॉ.विजय पाटील अशांनी केली आहे.

     शासनाने संक्रात सणाचे कालावधीत पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास बंदी घातली असून कोणीही पतंग उडविण्यासाठी मांजा मालाचा गैरकायदेशीर रित्या वापर करू नये.तसें आढळून आल्यास पर्यावरण कायदा सन १९८६ चे कलम ५,१५ सह भांदवि कलम १८८  प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन शिरपूर शहरातील नागरिकांना शिरपूर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामार्फत केले आहे.

Post a Comment

0 Comments