मुंबई (स्वराज्य लक्ष्य वृत्तसेवा) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडी मध्ये सहभागी झाल्याचे जाहीर केले आहे.परंतु ही निव्वळ धुळफेक असल्याचे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की दिनांक ९ जानेवारी २०२४ ला दिल्लीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीची आम्हाला कल्पना होती. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या सूत्रांच्या माहिती नुसार कालच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडी मध्ये सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते पण काय निर्णय निश्चित झाला ते समजलेले नाही.आणि जो पर्यंत वंचित बहुजन आघाडीला अधिकृत आमंत्रण येत नाही किंवा जागा वाटपाच्या चर्चेत बोलावत नाहीत तो पर्यंत या बातमीला काहीही तथ्य नाही असे रेखा ठाकूर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामार्फत जाहीर केले आहे.
वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचीच आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा शेवट पर्यंत आमचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन देखीलवंचित च्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments