धुळे : शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणी असलेल्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना बापूराव जगताप यांनी तक्रारदार यांच्याकडून 5000 रुपये लचेची मागणी करून तडजोड करत शेवट 4 हजार रुपये लाच स्वीकारताना श्रीमती पवार यांना रंगे हात पकडण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अक्कलकोट तालुका शिंदखेडा येथे माध्यमिक शिक्षक या पदावर सेवानिवृत्त झाले असून गट विमा योजना चे मंजूर झालेल्या 1,33,485 रुपये बिल तक्रारदार यांना अदा करण्यासाठी उपकोशागार कार्यालय शिंदखेडा येथे पाठवण्यासाठी श्रीमती अर्चना जगताप मुख्याध्यापिका या पाच हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात दूरध्वनीद्वारे माहिती दिली असता. सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोंडाईच्या येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार घेतली होती सदर तक्रारीची दिनांक 01/01/2024 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी तक्रारदार यांचे कडे तळजोडीअंती 4000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील प्रवीण मोरे, प्रवीण पाटील,सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केले आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री.माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे
Post a Comment
0 Comments